Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian Railways : तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होईल की नाही? या सोप्या पद्धतीने जाणून घ्या...

Indian Railways : तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होईल की नाही? या सोप्या पद्धतीने जाणून घ्या...

Indian Railways : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या  (IRCTC) वेबसाइट आणि अॅपवरून, लोकांना तिकीट बुकिंगपासून ट्रेन अपडेट्सपर्यंत सुविधा मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 03:08 PM2022-06-21T15:08:58+5:302022-06-21T15:12:38+5:30

Indian Railways : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या  (IRCTC) वेबसाइट आणि अॅपवरून, लोकांना तिकीट बुकिंगपासून ट्रेन अपडेट्सपर्यंत सुविधा मिळते.

indian railways latest rule how to check confirmation probability of waiting ticket by irctc see process | Indian Railways : तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होईल की नाही? या सोप्या पद्धतीने जाणून घ्या...

Indian Railways : तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होईल की नाही? या सोप्या पद्धतीने जाणून घ्या...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे हा भारताचा कणा आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात आणि यामुळेच हजारो गाड्या असूनही अनेक वेळा कन्फर्म तिकीट मिळण्यात अडचणी येतात. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून अनेक ऑनलाइन सुविधा पुरविल्या जातात. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या  (IRCTC) वेबसाइट आणि अॅपवरून, लोकांना तिकीट बुकिंगपासून ट्रेन अपडेट्सपर्यंत सुविधा मिळते.

रेल्वेच्या बहुतांश सुविधा ऑनलाइन असल्याने प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनाही फायदा झाला आहे. आता आयआरसीटीने आपल्या युजर्ससाठी एका महिन्यात ऑनलाइन तिकीट बुक करण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. आता तुम्ही आयआरसीटीसी आयडीशी आधार लिंक करून एका महिन्यात 24 तिकिटे बुक करू शकता. तुम्ही रेल्वेच्या वेबसाइटला भेट देऊन ट्रेनची स्थिती देखील तपासू शकता.

वेटिंग तिकीट कन्फर्म होईल की नाही? हे जाणून घ्या...
ट्रेनचे तिकीट बुक केल्यानंतर गरजेचे नाही की, तुमचे तिकीट कन्फर्म झाले. अशा परिस्थितीत तुम्हाला समजेल कीतुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता काय आहे? वेटिंग तिकीटाचे कन्फर्म  (waiting ticket confirmation) होण्याची संभाव्यता समजण्यासाठी तुम्हाला फक्त पीएनआर नंबरची आवश्यकता आहे. यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया....

जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस... 
1. यासाठी तुम्ही सर्वात आधी IRCTC वेबसाइटवर जा.
2. आता तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
3. यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, त्यावर PNR नंबर टाका आणि Get Status वर क्लिक करा.
4. आता तुम्ही स्क्रोल डाउन करून खाली या.
5. यानंतर Click Here to Get Confirmation Chance वर क्लिक करा.
6. आता तुमच्या समोर एक नवीन पॉप-अप विंडो ओपन होईल.
7. यामध्ये तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सांगितली जाईल.

Web Title: indian railways latest rule how to check confirmation probability of waiting ticket by irctc see process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.