नवी दिल्ली :भारतीय रेल्वेने नवीन पेमेंट गेटवे सर्व्हिस लॉन्च केली आहे. IRCTC-iPay असे या सेवेचे नाव असून, या माध्यमातून प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोपे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच IRCTC ने प्रवाशांसाठी बस तिकिटांची सेवाही सुरू केली आहे. त्यामुळे आता आयआरसीटीसीच्या मदतीने प्रवासी ट्रेन आणि विमानासह बस तिकीटही काढता येऊ शकते. (indian railways launches payment gateway irctc ipay for ticket booking and transaction)
प्रवाशांच्या सोयी, सुविधेसाठी भारतीय रेल्वेकडून अनेकविध उपक्रम राबवले जात आहेत. प्रवाशांना तिकीट बुकिंग सोपे, जलद आणि सुलभ होण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने बदल केले जात असतात. याचाच एक भाग म्हणून अलीकडेच ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ अर्थात आयआरसीटीसीने आपली वेबसाइट अपडेट केली होती. तसेच, Rail Connect अॅपमध्येही नवीन इंटरफेस आणि अतिरिक्त फिचर्स दिले होते.
'हे' काम न केल्यास ३१ मार्चनंतर Deactivate होईल पॅनकार्ड; जाणून घ्या महत्त्वाचे डिटेल्स
आत्मनिर्भर भारत व्हिजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे व्हिजन समोर ठेवून साइट आणि अॅपमध्ये बदल करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेची वेबसाइट इंटरनेटच्या माध्यमातून तिकिटे उपलब्ध होणारी आशियातील सर्वांत मोठी वेबसाइट ठरली आहे. प्रवाशांच्या सोयी, सुविधांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून व्यवहार सुलभतेसाठी आता एक पाऊल पुढे टाकत पेमेंट गेटवे लॉन्च करण्यात आले आहे, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले.
IRCTC-iPay चा वापर
IRCTC-iPay द्वारे प्रवाशांना तिकिटांसाठी पेमेंट करणे सुलभ होणार आहे. याद्वारे पेमेंट करण्यासाठी युझर्सना आपल्या UPI बँक अकाउंटच्या डेबिट कार्ड किंवा अन्य एखाद्या पेमेंट फॉर्मचा वापर करण्याची परवानगी आणि अन्य डिटेल्स द्यावे लागणार आहेत. या माध्यमातून प्रवासी काही सेकंदांत तिकीट बुकिंग करू शकणार आहेत. एकदा दिलेली माहिती भविष्यातील ऑनलाइन व्यवहारांसाठीही वापरता येऊ शकणार आहे. यासह IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे करण्यात आलेले तिकीट बुकिंग रद्द केल्यानंतर IRCTC iPay द्वारे इन्स्टन्ट रिफंडही मिळणार आहे. नवीन पेमेंट गेटवेमुळे युझर्सचा वेळ वाचणार आहे, असा दावा करण्यात येत आहे.