आपण नियमितपणे रेल्वे प्रवास करत असाल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. आता रेल्वेने आपल्या प्रवाशांकरिता तिकीट काढण्यासाठी (Ticketing) नवी सुविधा सुरू केली आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकिटासाठी लांबच्या लांब रांगेत उभे राहवे लागणार नाही. या सुविधेंतर्गत ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन (ATVM) द्वारे मिळणाऱ्या सुविधांसाठी आपण डिजिटल ट्रांझेंक्शनही करू शकता.
या अंतर्गत, आपण ATVM वरून तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक पास मिळविण्यासाठी डिजिटल मोडमध्ये पेमेंट करू शकता. अनेक रेल्वे स्थानकांवर ATVM, यूपीआय आणि क्यूआर कोडची व्यवस्थाही करण्यात आली आहे. याच्या सहाय्याने आपण ATVM स्मार्ट कार्ड देखील रिचार्ज करू शकता. ही सुविधा सुरू करताना प्रवाशांनी डिजिटल पद्धतीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले आहे.
लांबच-लांब रांगेत उभे राहण्यापासून मिळेल दिलासा -रेल्वेकडून प्रवाशांची अधिक गर्दी असलेल्या स्थानकांवर ATVM सुविधा सुरू करण्यात येत आहे. या स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते, अशा तक्रारी रेल्वे बोर्डाकडे आल्या होत्या. एवढेच नाही, तर लांबच अलांब रांगांमुळे अनेक वेळा प्रवाशांची ट्रेन चुकल्याच्या घटनाही घडल्या आहेत.