Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता ट्रेनमध्ये नसणार Guard!, जाणून घ्या कारण...

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता ट्रेनमध्ये नसणार Guard!, जाणून घ्या कारण...

Indian railways new rule : यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून (Railway Board) सर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रही देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या बदलाची मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 05:49 PM2022-05-10T17:49:14+5:302022-05-10T17:50:28+5:30

Indian railways new rule : यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून (Railway Board) सर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रही देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या बदलाची मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत होती.

indian railways new rule indian railways redesignated post of guard as train manager | रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता ट्रेनमध्ये नसणार Guard!, जाणून घ्या कारण...

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता ट्रेनमध्ये नसणार Guard!, जाणून घ्या कारण...

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता तुमच्या ट्रेनमध्ये गार्ड (Train Guard) नसणार आहेत. दरम्यान, रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण करत रेल्वे गार्ड शब्द बदलला आहे. आता ट्रेनमध्ये तैनात असलेल्या गार्डला ट्रेन मॅनेजर (Train Manager)  म्हटले जाणार आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून (Railway Board) सर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रही देण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या बदलाची मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत होती.

हा निर्णय रेल्वेने तातडीने लागू केला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांची ही मागणी यावर्षीच्या सुरुवातीला मान्य करण्यात आली होती. भारतीय रेल्वेनेही आपल्या  ऑफ‍िश‍ियल अकाउंटवर याची जाहीर घोषणा केली आहे. 2004 पासून कर्मचार्‍यांकडून गार्डचे पद बदलण्याची मागणी होत होती. गार्डचे काम केवळ सिग्नलला झेंडा दाखवणे आणि टॉर्च दाखवणे नाही, त्यामुळे त्याचे पद बदलले पाहिजे, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

'जबाबदारी बदलणार नाही'
रेल्वेने बस गार्डच्या पदनामात बदल केला असला तरी त्यांची जबाबदारी मात्र तशीच राहणार आहे. खरंतर गाड्यांमधील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच पार्सलचे साहित्य हाताळणे, प्रवाशांचे रक्षण करणे आणि ट्रेनची काळजी घेणे ही जबाबदारी गार्डची असते. अशा स्थितीत पदनाम बदलण्याची मागणीही रेल्वेने रास्त मानली आहे. पदनाम बदलल्याने या कर्मचाऱ्यांची जबाबदारी बदलणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुने पद - नवीन पद
- असिस्टंट गार्ड - असिस्टंट पॅसेंजर ट्रेन मॅनेजर
-  गुड्स गार्ड- गुड्स ट्रेन मॅनेजर
-  सीनियर गुड्स गार्ड- सीनिअर गुड्स ट्रेन मॅनेजर
- सीनियर पॅसेंजर गार्ड-सीनिअरपॅसेंजर ट्रेन मॅनेजर
- मेल/एक्सप्रेस गार्ड-मेल/एक्सप्रेस ट्रेन मॅनेजर

Web Title: indian railways new rule indian railways redesignated post of guard as train manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.