Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार ट्रेनचे कन्फर्म तिकीट, जाणून घ्या सविस्तर

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार ट्रेनचे कन्फर्म तिकीट, जाणून घ्या सविस्तर

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा आणि गरजा लक्षात घेऊन पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 02:33 PM2022-01-09T14:33:08+5:302022-01-09T14:34:14+5:30

Indian Railways : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा आणि गरजा लक्षात घेऊन पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली आहे.

indian railways new rule starts reservation ticket booking facility in post offices in uttar pradesh | Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार ट्रेनचे कन्फर्म तिकीट, जाणून घ्या सविस्तर

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार ट्रेनचे कन्फर्म तिकीट, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : Indian Railway News: रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ऑफलाइन तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जाण्याची आणि लांब रांग लावण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला (Post Office) भेट देऊन ट्रेनचे तिकीट देखील बुक करू शकता. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा आणि गरजा लक्षात घेऊन पोस्ट ऑफिसमधून रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली आहे.

या विशेष सुविधेसाठी रेल्वेचे तिकीट बुकिंग हाताळणारी कंपनी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) पुढाकार घेतला आहे. दरम्यान, ही सुविधा रेल्वेच्या आधुनिकीकरण योजनेचा एक भाग आहे, ज्या अंतर्गत रेल्वे टपाल विभागाच्या सहकार्याने पोस्ट ऑफिसमध्ये ट्रेन आरक्षणाची सुविधा सुरू करत आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या विशेष सुविधेअंतर्गत उत्तर प्रदेशपासून सुरुवात केली जात आहे. याठिकाणी जवळपास 9147 पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे लोकांचा बराच वेळ वाचेल कारण त्यांना त्यांचे रेल्वे तिकीट काढण्यासाठी स्टेशनवर किंवा त्यांच्या एजंटांकडे जावे लागणार नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे IRCTC च्या या नवीन सुविधेचा शुभारंभ केला.

दरम्यान, रेल्वेच्या या विशेष सेवेचा सर्वाधिक फायदा गावकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, दुर्गम गावांमध्ये आणि दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या लोकांनाही आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. जवळच्या पोस्ट ऑफिसमधून कोणीही त्यांचे तिकीट सहज मिळवू शकतो. यापूर्वी ऑफलाइन तिकिटांसाठी प्रवाशांना स्टेशनवर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते.

उत्तर मध्य रेल्वे (NCR) मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवम शर्मा यांनी सांगितले की, रेल्वेमंत्र्यांनी राज्याच्या राजधानीतील स्थानकावर आयोजित कार्यक्रमात गोमती नगर रेल्वे स्थानकाच्या नव्याने बांधलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारासह टर्मिनल सुविधा आणि कोचिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले. तसेच, त्यांनी गोमती नगर-कामाख्या एक्सप्रेस, मैलानी-बिछिया पॅसेंजर ट्रेन आणि कानपूर सेंट्रल-ब्रह्मावर्त मेमू ट्रेनचे उद्घाटन केले, असे शर्मा म्हणाले.

Web Title: indian railways new rule starts reservation ticket booking facility in post offices in uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.