नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वे तिकीट बुक करताना तुम्हाला काही विशेष कोड लक्षात ठेवावे लागतील. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, भारतीय रेल्वेने सीट बुकिंग कोड आणि कोच कोडमध्ये काही मोठे बदल केले आहेत. तसेच, रेल्वेने आपल्या गाड्यांमध्ये नवीन प्रकारचे कोच आणले आहेत.
या कोडद्वारे तुम्ही प्रवासी तिकीट बुक करताना आपल्या पसंतीची सीट निवडू शकता. रेल्वेने देशभरातील अनेक मार्गांवर विस्टाडोम कोच सुरू केले आहेत. रेल्वेने गाड्यांमध्ये अनेक जादा कोचची सुरुवात केली आहे. यामध्ये AC-3 टियरच्या इकॉनॉमी क्लासचाही समावेश आहे. दरम्यान, या प्रकारच्या कोचमध्ये 83 बर्थ आहेत. त्यांचे भाडेही खूप कमी आहे.
खास आहे विस्टाडोम कोचपर्यटनाला डोळ्यासमोर ठेवून रेल्वेने हा प्रकारचा कोच आणला आहे. विस्टाडोम कोचचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रेल्वेत बसून प्रवासी बाहेरचे दृश्य पाहू शकतात. या डब्यांचे छतही काचेचे असेल. रेल्वे जवळपास प्रत्येक राज्यात अशी किमान एक ट्रेन चालवेल. सध्या हा विस्टाडोम कोच मुंबईतील दादर ते गोव्यातील मडगावपर्यंत सुरू आहे.
कशी होईल बुकिंग?या सर्व कॅटगरीतील कोच आणि सीट्सच्या कोडबाबत सर्व झोनच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकांना सूचित करण्यात आले आहे. या अंतर्गत, थर्ड एसी क्लास इकॉनॉमी कोचचा बुकिंग कोड 3E असेल आणि कोचचा कोड M असेल. त्याचप्रमाणे विस्टाडोम एसी कोचचा कोड EV असा ठेवण्यात आला आहे. कोणत्या कोचचा बुकिंग कोड काय आहे, ते खालील प्रमाणे जाणून घ्या...
काय आहे नवीन बुकिंग कोड आणि कोच कोड?कोच क्लास बुकिंग कोड कोच कोडविस्टाडोम V.S. AC DV स्लीपर S.L. Sएसी चेअरकार C.C Cथर्ड एसी 3A Bएसी थ्री टियर इकोनॉमी 3E Mसेकंड एसी 2A Aगरीब रथ एसी थ्री टियर 3A Gगरीब रथ चेयरकार CC Jफर्स्ट एसी 1A Hएक्सक्युझिव्ह क्लास E.C Eअनूभुति क्लास E.A Kफर्स्ट क्लास F.C Fविस्टाडोम एसी E.V E.V