नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railway) अनेक विक्रम नोंदवले आहेत. या मालिकेत आता रेल्वेने दिल्लीतील किशनगंज ते त्रिपुराच्या जिरानियासाठी पहिली व्यापार माला एक्सप्रेस (Vyapar Mala Express) चालविली आहे. या मालवाहू एक्सप्रेसने अवघ्या 68 तासांत 2360 किमी अंतर पार केले आहे. (indian railways operated first vyapar mala express from delhi kishanganj to jirania tripura)
रेल्वेच्या या उपक्रमामुळे ईशान्य राज्यांमध्ये माल पोहोचविणे सोपे होईल. दरम्यान, देशाच्या कोणत्याही भागातून ईशान्य राज्यांत वस्तू पाठविणे हे एक मोठे आव्हान आहे. रस्ते मार्गाने दिल्लीहून त्रिपुराला माल पाठविण्यासाठी जवळपास 10-15 दिवस लागत होते.
अनेक लोकांना मिळेल रोजगार
देशातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या लहान, मोठ्या उद्योगांना मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने कौतुकास्पद प्रयत्न केले आहेत. जर तुमच्याजवळ एक ट्रेनसाठी संपूर्ण सामान नाही आहे, तरीही तुम्ही सामान पाठविण्यासाठी या एक्स्प्रेसची सुविधा वापरू शकता.
रेल्वेकडूनट ट्विट
भारतीय रेल्वेने एका ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेचे म्हणणे आहे की, पहिली व्यापार माला एक्स्प्रेस ट्रेन दिल्लीच्या किशनगंजहून त्रिपुराच्या जिरानियापर्यंत चालवण्यात आली आहे. ही लघु व मध्यम व्यावसायिकांसाठी उत्तम संधी ठरू शकते.
रफ्तार के साथ व्यापार की बात।
— Central Railway (@Central_Railway) March 13, 2021
व्यापार माला एक्सप्रेस के साथ।
भारतीय रेल ने चलाई पहली व्यापार माला एक्सप्रेस। #FreightFriendlyRailwayspic.twitter.com/Af7oHwjyjU
माल कमी असला तरीही छोट्या व्यापाऱ्यांना सुविधा
भारतीय रेल्वेची ही एक्सप्रेस माल कमी असला तरीही छोटे व्यापाऱ्यांना सोयी-सुविधा पुरवित आहे. या पुढाकाराने ते कमी वेळात स्वस्त आणि सोयीस्कर पद्धतीने आपली माल पाठवू शकतात.