नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे आपल्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे आणि नवीन अपडेट्स जारी करत आहे. दरम्यान, रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. आता तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करतेवेळी ज्या ठिकाणी उतरायचे आहे, ते स्टेशन चुकेल आणि ट्रेन पुढे जाईल, अशी चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्ही प्रवासात आरामात झोपू शकता. रेल्वे तुम्हाला स्टेशनवर येण्याच्या 20 मिनिटे आधी उठवेल. यामुळे तुमचे स्टेशन चुकणार नाही आणि तुम्ही सहज आराम करू शकाल. रेल्वेच्या या खास सुविधेबद्दल जाणून घ्या...
रेल्वेच्या या विशेष सेवेचे नाव 'डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म' असे आहे. अनेक वेळा ट्रेनमध्ये लोकांना झोप येते आणि यादरम्यान त्यांना ज्या स्टेशनवर उतरायचे असते, ते स्टेशन चुकते. हे सहसा रात्रीच्या वेळीच होते. या समस्येवर मात करण्यासाठीच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. रेल्वेने चौकशी सेवा 139 नंबरवर ही सुविधा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी 139 नंबरच्या इन्क्वायरी सिस्टमवर अलर्ट सुविधा मागू शकतात.
स्टेशन येण्याच्या 20 मिनिटे आधी येईल अलर्ट तुम्हालाही या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर ही सुविधा प्रवाशांना रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत उपलब्ध असणार आहे. यासाठी रेल्वेकडून केवळ तीन रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहेत. तुम्ही ही सेवा घेतल्यास, तुमच्या स्टेशनच्या 20 मिनिटे आधी तुमच्या फोनवर अलर्ट पाठवला जाईल. जेणेकरून तुम्ही तुमचे सामान वगैरे व्यवस्थित ठेवाल आणि स्टेशनवर आल्यावर ट्रेनमधून उतरू शकाल.
अशी सुरू करू शकता सर्व्हिस...- 'डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म' सेवा सुरू करण्यासाठी, तुम्ही IRCTC हेल्पलाइन 139 वर कॉल करू शकता.- कॉल रिसिव्ह झाल्यानंतर तुमची भाषा निवडा.- डेस्टिनेशन अलर्टसाठी पहिल्यांदा 7 नंबर आणि नंतर 2 नंबर दाबा.- त्यानंतर प्रवाशांकडून 10 अंकी पीएनआर क्रमांक विचारला जाईल.- पीएनआर नंबर प्रविष्ट केल्यानंतर कन्फर्म करण्यासाठी 1 डायल करा.- या प्रक्रियेनंतर, सिस्टम पीएनआर नंबरचे व्हेरिफिकेशन करा आणि वेकअप अलर्ट फीड करा.- त्याचा कम्फर्मेशन एसएमएस प्रवाशाच्या मोबाईलवर प्राप्त होईल.