नवी दिल्ली : ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही या सणासुदीच्या काळात (Festive Season) ट्रेनने तुमच्या घरी जाण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये मोफत प्रवास (Free Travel in Train) करू शकता.
सर्व वर्ग आणि सर्व प्रकारच्या लोकांसाठी रेल्वेकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. रेल्वेकडून तिकिटांवर विविध सवलती दिल्या जातात. त्याचबरोबर, अनेकांना मोफत प्रवास करण्याची सुविधाही मिळते. IRCTC कडून ट्रेनमध्ये भरपूर सवलत (Train Ticket Discount) मिळते.
बेरोजगार तरुणांच्या तिकिटावर 50 ते 100 टक्के सवलत आहे. दरम्यान, रेल्वेकडून विद्यार्थ्यांना घरापासून शाळा किंवा महाविद्यालयात जाणे-येणे, टूर, परदेशी विद्यार्थ्यांचा प्रवास, संशोधन कार्याशी संबंधित प्रवास इत्यादी अनेक कारणांसाठी ट्रेनमध्ये प्रवास करण्यावर सूट मिळते. याशिवाय 58 वर्षांच्या महिला आणि 60 वर्षांच्या पुरुषांनाही रेल्वे तिकिटात सूट देण्यात आली आहे.
विद्यार्थी करू शकतात मोफत प्रवास
रेल्वेच्या वतीने मुलींना पदवीपर्यंत एमएसटी (MST) द्वारे सेकंड क्लासमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळते. याशिवाय, जर मुलांबद्दल बोलायचे झाले तर अशा प्रवाशांना 12वी पर्यंत एमएसटीद्वारे सेकंड क्लासमध्ये मोफत प्रवास करण्याची परवानगी आहे. मुलाखतीला जाणाऱ्या बेरोजगार तरुणांना स्लीपर क्लासच्या तिकिटांमध्ये 50 टक्के आणि द्वितीय श्रेणीच्या तिकिटांमध्ये 100 टक्के सवलत मिळते.
दररोज लाखो लोक रेल्वेने करतात प्रवास
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांपैकी एक आहे. भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणे खूप सोपे आणि स्वस्त देखील आहे. रेल्वे ही देशातील गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसाठी प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेला प्राधान्य देतात.