Lokmat Money > बिझनेस न्यूज > उन्हाळ्यात प्रवाशांना मिळणार दिलासा, भारतीय रेल्वे चालवणार 217 विशेष गाड्या

उन्हाळ्यात प्रवाशांना मिळणार दिलासा, भारतीय रेल्वे चालवणार 217 विशेष गाड्या

भारतीय रेल्वेने उन्हाळी शाळांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 02:08 PM2023-04-12T14:08:36+5:302023-04-12T14:09:28+5:30

भारतीय रेल्वेने उन्हाळी शाळांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

indian railways will run 217 special trains in summer for passengers relief | उन्हाळ्यात प्रवाशांना मिळणार दिलासा, भारतीय रेल्वे चालवणार 217 विशेष गाड्या

उन्हाळ्यात प्रवाशांना मिळणार दिलासा, भारतीय रेल्वे चालवणार 217 विशेष गाड्या

नवी दिल्ली : जर तुमचा उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण, आता तुम्ही ट्रेनमध्ये तिकीट बुक करून कन्फर्म सीट मिळवू शकता. भारतीय रेल्वेने उन्हाळी शाळांच्या सुट्ट्या लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

रेल्वेने 217 विशेष गाड्या चालवण्याची आतापासूनच घोषणा केली आहे. या गाड्या पूर्ण 4010 फेऱ्या करतील. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर होऊ शकतो. बिहार आणि उत्तर प्रदेशमधील प्रवाशांची गर्दी पाहता विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल झोनमधून 10 गाड्या आणि एसडब्ल्यूआर झोनमधून 69 गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्या 1768 फेऱ्यासाठी धावतील. पश्चिम रेल्वेकडून 40 गाड्या चालवल्या जात आहेत ज्या 846 वेळा प्रवाशांना घेऊन जातील. 

याचबरोबर दक्षिण मध्य रेल्वे झोनला 48 विशेष गाड्या चालवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या गाड्या 528 फेऱ्या करतील.याशिवाय, एनडब्ल्यूआरने जूनपासून 16 गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या 368 फेऱ्या करतील. 

एनडीडब्ल्यूआर झोनमधून 16 विशेष गाड्या धावतील, ज्या 368 फेऱ्या करतील. अशाप्रकारे देशाचा सर्व भाग व्यापण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्या शहरांवर आणि स्थानकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जिथे सर्वाधिक मागणी आहे. विशेषतः दिल्ली आणि मुंबई. तसेच, अमृतसर, लखनौ, पाटणा, भोपाळ, गोवा यासाठीही गाड्यांची सुविधा देण्यात आली आहे.
 

Web Title: indian railways will run 217 special trains in summer for passengers relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.