नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या जानेवारीपासून म्हणजेच आजपासून अनेक गाड्या धावणार आहेत. कोरोना संकटामुळे अनेक गाड्यांचे परिचालन बंद करण्यात आले होते. आता या गाड्या पुन्हा सुरु करण्यात येणार असून यामध्ये पॅसेंजर गाड्यांचाही समावेश आहे. याशिवाय, गोरखपूर ते मैलानी दरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत. तसेच, कासगंज ते कानपूर दरम्यान काही गाड्या सुरु करण्यात येणार आहेत.
ईस्टर्न रेल्वेकडून ट्विट
>> ईस्टर्न रेल्वेने ट्विट करून सांगितले की, 63503 बर्धमान-हटिया मेमू पॅसेंजर ट्रेन आजपासून सुरु होणार आहे.
>> 63598/63597 आसनसोल-रांची-आसनसोल मेमू पॅसेंजर ट्रेन सुरु होणार आहे.
>> 3596/56595 आसनसोल-बोकारो स्टील सिटी-आसनसोल मेमू पॅसेंजर ट्रेन आजपासून सुरु होईल.
05009/05010 Gorakhpur-Mailani-Gorakhpur Special Train from 06.01.2021 till 31.01.2021@drm_drmiznpic.twitter.com/dtPe19MuAa
— North Eastern Railway (@nerailwaygkp) January 4, 2021
याशिवाय, नॉर्थ-ईस्टर्न रेल्वेने सांगितले की, 05009/05010 गोरखपुर-मैलानी-गोरखपुर एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही ट्रेन 31 जानेवारीपर्यंत चालविण्यात येणार आहे.
'ही' ट्रेन 31 जानेवारीपर्यंत धावणार
रेल्वेने 6 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत ट्रेन नंबर 05046 सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी लखनऊहून काठगोदामसाठी धावणार आहे.
काही ट्रेन रद्द होण्याची शक्यता
>> ट्रेन नंबर 05612 अमृतसर-दरभंगा एक्सप्रेस स्पेशल ट्रेन आजपासून रद्द केली जाणार आहे.
>> ट्रेन नंबर 02716 अमृतसर-नांदेड एक्सप्रेस आजपासून नवी दिल्लीहून सुरु होईल.
>> ट्रेन नं बर 09025 बांद्रा टर्मिनस-अमृतसर एक्सप्रेस आजपासून चंदीगडहून सुरु होईल. साधारणपणे ही ट्रेन अमृतसरहून सुरु होते.