Join us

रेल्वेचा मोठा निर्णय, प्रिंटिंग प्रेस बंद करणार, डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2023 4:34 PM

Indian Railways Latest News: डिजिटल इंडियाच्या  (Digital India) दिशेने आणखी एक पाऊल टाकताना रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून घेण्यात आलेला नवा निर्णय ऐकून तुम्हाला धक्का बसेल. रेल्वेने आपच्या बाकीच्या प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात त्यांचे कंत्राट खासगी विक्रेत्यांना दिले जाऊ शकते. डिजिटल इंडियाच्या  (Digital India) दिशेने आणखी एक पाऊल टाकताना रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

2017 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या कार्यकाळात असा निर्णय घेण्यात आला होता, ज्यामध्ये रेल्वेद्वारे चालवले जाणारे प्रिंटिंग प्रेस बंद करण्याची चर्चा झाली होती. या प्रिंटिंग प्रेस बंद झाल्यानंतर प्रिंटिंगचे संपूर्ण कंत्राट खासगी विक्रेत्यांना दिले जाणार आहे. यानंतर प्रिंटिंग प्रेस बंद करण्याची तयारी करण्यात येणार आहे. त्यावेळी प्रिंटिंग प्रेस बंद झाल्यानंतर काही प्रिंटिंग प्रेसचे संचालन करण्यात आले. 

आता त्या सुद्धा प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने 14 पैकी 9 प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित 5 प्रिंटिंग प्रेस रेल्वेच्या ताब्यात ठेवण्यात आल्या होत्या. आता या प्रिंटिंग प्रेस रेल्वेकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भायखळा मुंबई, हावडा, शकूरबस्ती-दिल्ली, रोयापुरम चेन्नई आणि सिकंदराबाद येथे सुरू असलेली प्रिटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय नुकताच रेल्वेच्या आदेशात घेण्यात आला आहे. 

4 जून 2019 रोजीच्या पत्रात प्रेस बंद करण्याचे म्हटले होते. या बातम्यांनंतर प्रश्न उपस्थित होत आहे की, आगामी काळात रेल्वेची तिकिटे कशी छापली जाणार? त्यासाठी आगामी काळात खासगी प्रिटिंग प्रेसला निविदा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तिकिटांची छपाई आणि इतर साहित्य तयार करण्याचे कंत्राट खासगी प्रिटिंग प्रेसमध्ये दिले जाणार आहे. 

दरम्यान, रेल्वे आता फक्त गाड्या चालवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आरक्षित तिकिटे बहुतेक ई-तिकीटिंगद्वारे बुक केली जातात. याशिवाय 81 टक्के तिकिटे ई-तिकीटिंगद्वारे डिजिटल पद्धतीने बुक केली जातात. 

टॅग्स :व्यवसायभारतीय रेल्वे