नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाची होत असलेली घसरण हा चिंतेचा विषय ठरत चालला आहे. बँक आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी होत असल्याने रुपया घसरला आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे विदेशी भांडवल काढून घेतले जात असल्याने रुपया घसरत असल्याचं एक कारण दिलं जात आहे.
मंगळवारी बाजार बंद असल्याकारणानं बुधवारी रुपया नीचांकावर पोहोचला आहे. आता रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला असून, रुपया 73.33वर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत चाललेल्या किमतीमुळे रुपयाची घसरण होत आहे. कच्च्या तेलाच्या वाढणा-या किमतीमागे अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध हे मुख्य कारण आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुपयामधील घसरण नवनवे रेकॉर्ड तयार करत आहे. आता आशियाच्या बाजारात रुपयाची स्थिती फार वाईट आहे. घसरत्या रुपयाचा प्रभाव हा भारतीय शेअर बाजारावरही पडत आहे. त्यामुळेच सेन्सेक्सही 200 पॉइंटने खाली येऊन 36,300 रुपयांवर पोहोचला आहे. तर निफ्टी 61 अंकांच्या घसरणीसह 10,943वर स्थिरावला आहे.
Indian #Rupee now at 73.33 versus the US dollar. pic.twitter.com/kMde7nS54B
— ANI (@ANI) October 3, 2018