Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Update : टेक महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिस सुस्साट! पण, 'या' शेअर्सने गुंतवणूकदारांची वाढली धाकधूक

Stock Market Update : टेक महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिस सुस्साट! पण, 'या' शेअर्सने गुंतवणूकदारांची वाढली धाकधूक

Stock Market Update : सोमवारच्या मोठ्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार आज सावरलेला दिसला. मात्र, निर्माणक्षेत्रात अद्याप सुस्ती पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:51 PM2024-10-01T15:51:26+5:302024-10-01T15:52:24+5:30

Stock Market Update : सोमवारच्या मोठ्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार आज सावरलेला दिसला. मात्र, निर्माणक्षेत्रात अद्याप सुस्ती पाहायला मिळत आहे.

indian share market update Tech Mahindra Wipro and Infosys shares rocket | Stock Market Update : टेक महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिस सुस्साट! पण, 'या' शेअर्सने गुंतवणूकदारांची वाढली धाकधूक

Stock Market Update : टेक महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिस सुस्साट! पण, 'या' शेअर्सने गुंतवणूकदारांची वाढली धाकधूक

Stock Market Update : भारतीय शेअर बाजारात काल (सोमवार) झालेल्या पडझडीनंतर आता मंगळवारी जोरदार सुरुवात केली. आजच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली. गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शेअर बाजार दिवसाच्या उच्चांकावरून घसरला. ऊर्जा आणि बँकिंग शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण झाली आहे. आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली आहे. असे असतानाही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदीमुळे उत्साह होता. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स ३४ अंकांच्या किंचित घसरणीसह ८४,२६६ वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४ अंकांच्या घसरणीसह २५,७९७ अंकांवर बंद झाला.

मार्केट कॅपमध्ये वाढ 
सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख बाजार सेन्सेक्स घसरुन बंद झाले. परंतु, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या घसरणीमुळे लिस्टेड शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४७४.९८ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात ४७४.३५ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये ६३००० कोटी रुपयांची उसळी पाहायला मिळाली.

सेक्टरोल अपडेट 
आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, मीडिया आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली. तर ऊर्जा, तेल आणि वायू, आरोग्यसेवा, बँकिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे. पण सर्वाधिक तेजी बाजारातील हाय मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये पाहायला मिळाली. निफ्टी मिडकॅप सेन्सेक्स २०४ अंकांच्या तेजीसह ६०,३५८ अंकांवर तर निफ्टी स्मॉलकॅप सेन्सेक्स १५१ अंकांच्या उसळीसह १९,३३१ अंकांवर बंद झाला.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स 
सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १४ शेअर्स वाढीसह बंद झाले तर १६ घसरले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २१ वाढीसह आणि २९ घसरणीसह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये टेक महिंद्रा २.९३ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.२२ टक्के, कोटक बँक १.५५ टक्के, इन्फोसिस १.५३ टक्के, एचसीएल टेक १.१८ टक्के, एसबीआय १.०१ टक्के, अदानी पोर्ट्स ०.९३ टक्के, नेस्ले ०.६८ टक्के, ICICI बँक ०.५६ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.३३ टक्के, TCS ०.३२ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.१२ टक्के, बजाज फायनान्स ०.९३ टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या शेअर्समध्ये इंडसइंड बँक २.६४ टक्क्यांनी, एशियन पेंट्स १.५४ टक्क्यांनी, एचयूएल १.०३ टक्क्यांनी, टाटा स्टील ०.९८ टक्क्यांनी घसरून बंद झाले.

Web Title: indian share market update Tech Mahindra Wipro and Infosys shares rocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.