Lokmat Money > बिझनेस न्यूज > Indian startup success stories: कडुनिंबाच्या फ्लेवरचा साबण बनवून उभी केली कोट्यवधींची कंपनी, असा कमावला पैसा

Indian startup success stories: कडुनिंबाच्या फ्लेवरचा साबण बनवून उभी केली कोट्यवधींची कंपनी, असा कमावला पैसा

History of margo soap: भारतीय बाजारपेठेत अनेक ब्रँड आले. त्यापैकी काहींनी शतकानुशतके बाजारावर राज्य केले. अशातच आज आम्ही तुम्हाला एका साबणाबद्दल सांगत आहोत, जो १०० वर्षांहून अधिक काळ लोक विकत घेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 02:46 PM2023-01-07T14:46:10+5:302023-01-07T14:46:41+5:30

History of margo soap: भारतीय बाजारपेठेत अनेक ब्रँड आले. त्यापैकी काहींनी शतकानुशतके बाजारावर राज्य केले. अशातच आज आम्ही तुम्हाला एका साबणाबद्दल सांगत आहोत, जो १०० वर्षांहून अधिक काळ लोक विकत घेत आहेत.

Indian startup success stories Created a company worth crores by making neem flavored soap, earned money like this | Indian startup success stories: कडुनिंबाच्या फ्लेवरचा साबण बनवून उभी केली कोट्यवधींची कंपनी, असा कमावला पैसा

Indian startup success stories: कडुनिंबाच्या फ्लेवरचा साबण बनवून उभी केली कोट्यवधींची कंपनी, असा कमावला पैसा

ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा इंग्रज बंगालमधून राज्य करत होते. त्या काळात कलकत्ता हे एक मोठे व्यापारी केंद्र होते. या कारणास्तव, त्या काळातील प्रत्येक व्यवसायाचा कलकत्त्याशी (आताचा कोलकाता) संबंध होता असे तुम्हाला दिसून येईल. अशा परिस्थितीत स्वदेशी चळवळीतूनही अनेक कंपन्या बाहेर पडल्या. त्यापैकी अनेक कंपन्या आजही त्यांची बाजारपेठेत कायम आहेत. आम्ही तुम्हाला आज मार्गो साबणाबद्दल सांगत आहोत. एकेकाळी या साबणाला खूप महत्त्व दिले जायचे. औषधी गुणधर्मामुळे हा साबण बाजारात चांगलाच विकला जायचा. आजही हा साबण बाजारात तयार होतो. जाणून घेऊया या साबणाचा इतिहास काय आहे.

स्वदेशी ब्रँड
के. सी. दास हे रसायनशास्त्राचे जाणकार होते, त्यांनीही याच विषयातून अभ्यास केला. याच कारणामुळे त्यांना कडुनिंबाचे फायदे जाणून घेता आले. देशातील जनतेलाही कडुनिंबाचे फायदे माहीत होते. मग काय, याचा योग्य फायदा घेत त्यांनी कडुनिंबाला साबणाचा आकार दिला आणि अशा प्रकारे बाजारात मार्गो साबण अस्तित्वात आला. यासोबतच त्यांनी कडुनिंबाची टूथपेस्टही तयार केली. याशिवाय लव्हेंडर ड्यू नावाच्या उत्पादनानेही त्या काळात बाजारात वर्चस्व गाजवले होते. यानंतर कंपनीने अरामस्क साबण, महाभृंगराज तेल आणि चेक डिटर्जंट सारखी इतर उत्पादने देखील बनवली.

का झाला प्रसिद्ध?
या साबण कंपनीचे मालक के. सी. दास यांनी मार्गो साबणाचे दर अशा प्रकारे निश्चित केले की प्रत्येक वर्गातील माणूस ते उत्पादन बाजारात खरेदी करू शकेल. त्यामुळे मार्गो देशभर प्रसिद्ध झाला. त्या दिवसांत, लोकांनी हा साबण हातोहात विकत घेतला आणि काही वर्षांतच कंपनीला तमिळनाडूमध्येही उत्पादनासाठी कारखाना उघडावा लागला. 1990 च्या दशकात मार्गो साबणाचा बाजारपेठेत जलवा होता.

1988 मध्ये भारतीय बाजारपेठेत त्याचा हिस्सा 8 टक्क्यांहून अधिक होता. कालांतरानं हेंकेल कंपनीने तो 75 कोटी रुपयांना विकत घेतला. 2011 मध्ये, ज्योती लॅबोरेटरीजने या ब्रँडशी संबंधित सर्व हक्क विकत घेतले. आता ही कंपनी मार्गो या ब्रँड नावाने साबणाव्यतिरिक्त फेसवॉश, हँडवॉश आणि सॅनिटायझर विकते. याशिवाय नीम टूथपेस्ट नीम अॅक्टिव्ह या ब्रँड नावाने विकली जाते.

Web Title: Indian startup success stories Created a company worth crores by making neem flavored soap, earned money like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.