Lokmat Money > बिझनेस न्यूज > Layoffs in Startups : भारतीय स्टार्टअप्सनी उभारला मोठा निधी, तरीही 2,000 पेक्षा जास्त नोकर कपात 

Layoffs in Startups : भारतीय स्टार्टअप्सनी उभारला मोठा निधी, तरीही 2,000 पेक्षा जास्त नोकर कपात 

Layoffs in Startups : सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना 67 डीलमध्ये 265 मिलियन डॉलर मिळाले आहेत, तर 12 स्टार्टअप्सनी आपल्या ट्रांजक्शनचा खुलासा केलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 02:12 PM2023-02-07T14:12:52+5:302023-02-07T14:13:23+5:30

Layoffs in Startups : सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना 67 डीलमध्ये 265 मिलियन डॉलर मिळाले आहेत, तर 12 स्टार्टअप्सनी आपल्या ट्रांजक्शनचा खुलासा केलेला नाही.

indian startups collected over one billion dollar but 14 companies layoffs to 2100 employees in january 2023 | Layoffs in Startups : भारतीय स्टार्टअप्सनी उभारला मोठा निधी, तरीही 2,000 पेक्षा जास्त नोकर कपात 

Layoffs in Startups : भारतीय स्टार्टअप्सनी उभारला मोठा निधी, तरीही 2,000 पेक्षा जास्त नोकर कपात 

नवी दिल्ली : या वर्षी जानेवारीमध्ये भारतीय स्टार्टअप्सनी जवळपास 926 मिलियन डॉलरच्या 22 बिझनेस डील केल्या आहेत. जानेवारीत सुमारे 1.2 बिलियन डॉलरचा निधी जमा केला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्सना 67 डीलमध्ये 265 मिलियन डॉलर मिळाले आहेत, तर 12 स्टार्टअप्सनी आपल्या ट्रांजक्शनचा खुलासा केलेला नाही.

आयएएनएसने स्टार्टअप न्यूज पोर्टल एनट्रेकरची एक शाखा फिनट्रेकरच्या रिपोर्टच्या हवाल्याने सांगितले आहे की, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्ससाठी सरासरी डील साइज जवळपास 4 मिलियन डॉलर होती आणि त्यांनी यावर्षी 1.2 बिलियन डॉलरची रक्कम जमा केली आहे. दुसरीकडे, मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 14 स्टार्टअप कंपन्यांनी जानेवारी 2023 दरम्यान 2,100 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

'फोन पे'ने ( PhonePe) उभारला सर्वाधिक निधी
भारतीय स्टार्टअप्समध्ये, डिजिटल पेमेंट अॅप कंपनी PhonePe ने जानेवारीमध्ये सुमारे 350 मिलियन डॉलर निधी उभारला आहे, तर क्रेडिटकीने 120 मिलियन उभारले आहेत. या दोन्ही स्टार्टअप कंपन्यांनी एकूण निधीपैकी 40 टक्के निधी उभारला आहे.

18 कंपन्यांचे विलीनीकरण आणि अधिग्रहण
ईकॉमर्स वेबसाइटमध्ये सर्वाधिक डील झाली आहे. रिपोर्टनुसार, बंगळुरूमध्ये 60 डील झाल्या आहेत, तर दिल्ली एनसीआरमध्ये 15 डील झाल्या आहेत. याचबरोबर, भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमने जानेवारीमध्ये सर्व विभागांमध्ये 18 विलीनीकरण आणि अधिग्रहण पाहिले आहेत. तसेच, या कालावधीच्या तुलनेत 2022 च्या तुलनेत यावर्षी अधिक डील झाल्या आहेत, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

या भारतीय स्टार्टअप्सकडून कर्मचारी कपात
2023 मध्ये 14 स्टार्टअप कंपन्यांनी 2,135 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. यामध्ये MediBuddy, Swiggy, Sharechat, Ola, Dunzo आणि Lead यासारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. 2022 या वर्षात भारतीय स्टार्टअप्सनी 20,500 कर्मचाऱ्यांना काढून टाकले.

Web Title: indian startups collected over one billion dollar but 14 companies layoffs to 2100 employees in january 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.