Lokmat Money > बिझनेस न्यूज > परदेशी गुंतवणूकदारांनी दिला दगा! बाजारात मोठी घसरण; 'हे' शेअर 18 टक्क्यांनी घसरले

परदेशी गुंतवणूकदारांनी दिला दगा! बाजारात मोठी घसरण; 'हे' शेअर 18 टक्क्यांनी घसरले

Stock Market Update: शेअर बाजारात विक्रीच्या या कालावधीत सेन्सेक्स त्याच्या उच्चांकावरून ६००० अंकांनी तर निफ्टी सुमारे २१०० अंकांनी घसरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:09 PM2024-10-25T16:09:10+5:302024-10-25T16:09:10+5:30

Stock Market Update: शेअर बाजारात विक्रीच्या या कालावधीत सेन्सेक्स त्याच्या उच्चांकावरून ६००० अंकांनी तर निफ्टी सुमारे २१०० अंकांनी घसरला आहे.

indian stock market indusind bank adani ports mahindra drag market nifty midcap crash points sensex closes below 80000 | परदेशी गुंतवणूकदारांनी दिला दगा! बाजारात मोठी घसरण; 'हे' शेअर 18 टक्क्यांनी घसरले

परदेशी गुंतवणूकदारांनी दिला दगा! बाजारात मोठी घसरण; 'हे' शेअर 18 टक्क्यांनी घसरले

Stock Market : आजचे सत्र भारतीय शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरले आहे. ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या व्यापार सत्रात बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स ८०००० च्या खाली घसरला. मिडकॅप समभाग आणि स्मॉल कॅप शेअर्सही यात मागे राहिले नाही. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. बाजार बंद झाल्यानंतर सेन्सेक्स ६६३ अंकांनी घसरून ७९,४०२ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१८ अंकांनी घसरून २४,१८० अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये चढउतार
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १० वाढीसह बंद झाले तर २० शेअर्स घसरले. इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. हा शेअर सुमारे १८.७९ टक्क्यांनी घसरले. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा ३.५६ टक्क्यांनी, एल अँड टी ३.०१ टक्क्यांनी, एनपीटीसी २.७३ टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स २.३३ टक्क्यांनी, मारुती २.१४ टक्क्यांनी घसरले. वाढत्या शेअर्समध्ये ITC २.२४ टक्के, ॲक्सिस बँक १.८५ टक्के, HUL ०.९६ टक्के, सन फार्मा ०.५३ टक्के, ICICI बँक ०.५१ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान
आजही शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४३७.७६ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या सत्रात ४४४ लाख कोटी रुपयांच्या जवळ होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

Web Title: indian stock market indusind bank adani ports mahindra drag market nifty midcap crash points sensex closes below 80000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.