Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBIच्या चांगल्या निर्णयानंतरही बाजार निगेटीव्ह! 'या' शेअर्समधील विक्रीमुळे मार्केट पडलं

RBIच्या चांगल्या निर्णयानंतरही बाजार निगेटीव्ह! 'या' शेअर्समधील विक्रीमुळे मार्केट पडलं

Indian Stock Market : आरबीआयच्या चलनविषयक धोरणात चांगल्या गोष्टी दिसत असूनही एफएमसीजी-ऊर्जा शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरला. निफ्टी २५००० च्या खाली बंद झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 04:13 PM2024-10-09T16:13:20+5:302024-10-09T16:14:14+5:30

Indian Stock Market : आरबीआयच्या चलनविषयक धोरणात चांगल्या गोष्टी दिसत असूनही एफएमसीजी-ऊर्जा शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार घसरला. निफ्टी २५००० च्या खाली बंद झाला

indian stock market lost all gains due to selling in fmcg energy stocks | RBIच्या चांगल्या निर्णयानंतरही बाजार निगेटीव्ह! 'या' शेअर्समधील विक्रीमुळे मार्केट पडलं

RBIच्या चांगल्या निर्णयानंतरही बाजार निगेटीव्ह! 'या' शेअर्समधील विक्रीमुळे मार्केट पडलं

Indian Stock Market : आरबीआयच्या चलन धोरण बैठकीच्या निर्णयापूर्वी सकाळी शेअर बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळाला. आरबीआय रेपो दराबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशा आशा होती. मात्र, आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. आरबीआयच्या चलनविषयक धोरणात चांगले निर्णय असतानाही एफएमसीजी आणि ऊर्जा शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे व्यापाराच्या शेवटच्या तासात भारतीय शेअर बाजार घसरला. निफ्टी दिवसाच्या उच्चांकावरून २८० अंकांनी घसरला तर सेन्सेक्स १००० अंकांनी आपटला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये वाढ झाली आहे. व्यवहाराच्या शेवटी BSE सेन्सेक्स १६८ अंकांनी किरकोळ घसरून ८१,४६७ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३१ अंकांनी घसरून २४९८१ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये चढउतार
सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २१ शेअर्स वाढीसह बंद झाले तर ९ शेअर्स तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २९ शेअर्स वाढीसह तर २१ शेअर्स तोट्यासह बंद झाले. वाढत्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स २.१५ टक्के, टेक महिंद्रा १.९२ टक्के, मारुती सुझुकी १.८० टक्के, एसबीआय १.६६ टक्के, बजाज फायनान्स १.५७ टक्के, ॲक्सिस बँक १.५० टक्के, भारती एअरटेल १.४४, बजाज फिनसर्व्ह १.३५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. घसरलेल्या शेअर्समध्ये आयटीसी ३.०८ टक्के, नेस्ले २.२१ टक्के, रिलायन्स १.६५ टक्के, एचयूएल १.४७ टक्के, एलअँडटी १.१३ टक्के, इंडसइंड बँक ०.९७ टक्के घसरून बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची वाढ
सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण होऊनही भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे मार्केट कॅप ४६२.४३ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात ४५९.५० लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

कुठल्या सेक्टरमध्ये काय चाललंय?
आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, रिअल इस्टेट, मीडिया, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर एफएमसीजी, बँकिंग, ऊर्जा आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स घसरले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली.

Web Title: indian stock market lost all gains due to selling in fmcg energy stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.