Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीय पर्यटक, प्रवाशांची आॅस्ट्रेलियाला मोठी पसंती

भारतीय पर्यटक, प्रवाशांची आॅस्ट्रेलियाला मोठी पसंती

भारतीय पर्यटक व प्रवाशांच्या दक्षिण आॅस्ट्रेलियातील खर्चात अवघ्या एका वर्षात १३ दशलक्ष आॅस्ट्रेलियन डॉलरची वाढ झाली

By admin | Published: April 4, 2017 04:42 AM2017-04-04T04:42:18+5:302017-04-04T04:42:18+5:30

भारतीय पर्यटक व प्रवाशांच्या दक्षिण आॅस्ट्रेलियातील खर्चात अवघ्या एका वर्षात १३ दशलक्ष आॅस्ट्रेलियन डॉलरची वाढ झाली

Indian tourists, travelers want Australia big favorites | भारतीय पर्यटक, प्रवाशांची आॅस्ट्रेलियाला मोठी पसंती

भारतीय पर्यटक, प्रवाशांची आॅस्ट्रेलियाला मोठी पसंती

मुंबई : भारतीय पर्यटक व प्रवाशांच्या दक्षिण आॅस्ट्रेलियातील खर्चात अवघ्या एका वर्षात १३ दशलक्ष आॅस्ट्रेलियन डॉलरची वाढ झाली आहे. या प्रवाशांनी २०१५ मध्ये १५ दशलक्ष आॅस्ट्रेलियन डॉलर खर्च केले होते, तर दुसऱ्या वर्षी हा आकडा २८ दशलक्ष आॅस्ट्रेलियन डॉलरवर गेला. ही माहिती दक्षिण आॅस्ट्रेलिया पर्यटन आयोगाने दिली.
प्रवासाच्या बदललेल्या सवयींसह इतर अनेक कारणांमुळे प्रवाशांनी खर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय पर्यटक आता अनुभवांसाठी जास्त खर्च करीत आहेत, असे या आयोगाच्या दक्षिण पूर्व अशिया आणि भारताच्या संचालक डॅना उर्मोनास यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
उर्मोनास म्हणाल्या, ‘दूरचित्रवाणी संच निर्मात्या कंपन्यांशी करार, व्यापार भागीदार देत असलेले टुर पॅकेजेस आणि डिजिटल मार्केटिंग कार्यक्रमांमुळे पर्यटनात वेगवेगळे अनुभव घेणे व विविध उपक्रमांत सहभाग घेण्याबद्दल जागरूकता वाढली आहे.’
भारतीय पर्यटकांमध्ये
अ‍ॅडलेड, कांगारू लँड, बॅरोस्सा
आणि अ‍ॅडलेड हिल्सचे मोठे
आकर्षण असल्याचेही डॅना उर्मोनास म्हणाल्या. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Indian tourists, travelers want Australia big favorites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.