Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिपोर्ट! भारतीय लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च, ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा

रिपोर्ट! भारतीय लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च, ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा

प्रतीविवाह सरासरी खर्च १२.५ लाख रुपये, भारतीय लोक अन्न व किराणा सामानानंतर सर्वाधिक खर्च लग्नांवर करतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 06:34 AM2024-06-29T06:34:46+5:302024-06-29T06:35:07+5:30

प्रतीविवाह सरासरी खर्च १२.५ लाख रुपये, भारतीय लोक अन्न व किराणा सामानानंतर सर्वाधिक खर्च लग्नांवर करतात

Indian weddings cost twice as much as education, 3 years worth of earnings | रिपोर्ट! भारतीय लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च, ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा

रिपोर्ट! भारतीय लग्नांवर शिक्षणापेक्षा दुप्पट खर्च, ३ वर्षांच्या कमाईचा चुराडा

नवी दिल्ली : भारतात लग्न समारंभांवर शिक्षणापेक्षा दुपटीपेक्षा अधिक खर्च केला जातो, अशी माहिती गुंतवणूक संस्था जेफरीजने केलेल्या एका अहवालात देण्यात आली आहे. भारतात एका लग्नावर सरासरी १५ हजार डॉलर म्हणजेच १२.५ लाख रुपये खर्च होतात, असेही जेफरीजने म्हटले आहे.

भारतातील विवाह बाजार १०.९ लाख कोटी रुपयांचा झाला आहे. तो चीनपेक्षा कमी असला तरी अमेरिकेपेक्षा दुप्पट आहे. भारतीय लोक अन्न व किराणा सामानानंतर सर्वाधिक खर्च लग्नांवर करतात. भारतीयांचे सरासरी वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये असून, लग्नावरील त्यांचा सरासरी खर्च तीन वर्षांच्या कमाई एवढा असतो. 

व्यवसायांना अच्छे दिन 
भारतात दरवर्षी सुमारे ८० लाख ते १ कोटी विवाह होतात. विवाहामुळे अनेक क्षेत्रांची सध्या चलती आहे. ज्वेलरी उद्योगात ५० टक्केपेक्षा अधिक पैसा हा वधूच्या दागिन्यांच्या विक्रीतून येतो.

देश     वार्षिक     विवाह 
    लग्नसंख्या     बाजार
भारत     ८०-१०० लाख     १०.९ लाख कोटी
चीन     ७०-८० लाख     १४.३ लाख कोटी
अमेरिका     २०-२५ लाख     ५.९ लाख कोटी

भारतीय लोक बालवाडीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणावर होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा दुप्पट खर्च लग्नावर करतात.

दागिने         ३.३५ लाख कोटी
जेवण         २.१७ लाख कोटी
इव्हेंट्स         १.६७ लाख कोटी
फोटो-व्हिडिओ         १.० लाख कोटी
कपडे         ८३,५७४ कोटी
सजावट         ७५,२१७ कोटी
इतर        १.७५ लाख कोटी
(खर्च रुपयांत)
 

Web Title: Indian weddings cost twice as much as education, 3 years worth of earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न