तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जपान जगातील सर्वात अत्याधुनिक देश मानला जातो. जापानकडे पाहण्याचा अन्य देशांचा दृष्टीकोनही निराळा आहे. परंतु तुम्ही जपानच्या लोकांबाबत काही गोष्टी जाणता का? त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचं आरोग्य कसं आहे, त्यांची दिनचर्या कशी आहे?McKinsey Health Institute नं नुकतंच एक सर्वेक्षण केलं. यातून शारीरिक, मानसिक, सामाजित आणि अध्यात्मिक आरोग्याबाबत मत विचारून कर्मचाऱ्यांच्या वेलनेसच्या जागतिक आकडेवारीत जपान यादीत अंतिम स्थानी पोहोचला आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार ३० देशांतून ३० हजारांपेक्षा अधिक कामगारांच्या सर्वेक्षणात जपानला २५ टक्के गुण देम्यात आले. या सर्वेक्षणात तुर्कीनं सर्वाधिक ७८ टक्के, भारत ७६ टक्के आणि चीननं ७५ टक्के गुण मिळवले. याची जागतिक सरासरी ५७ टक्के होती.जरी जपानी व्यवसायांनी आजीवन रोजगार आणि नोकरीची सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रतिष्ठा निर्माण केली असली तरी, याचा अर्थ असाही होतो की कर्मचारी आनंदी नसल्यास त्यांना नोकरी बदलण्यात अडचण येऊ शकते. आंतरसांस्कृतिक संवाद आणि व्यवसाय पद्धतींबद्दल कंपन्यांना सल्ला देणाऱ्या रोशेल कॉप यांच्या मते, आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये जपानला सातत्यानं कमी रेटिंग मिळाल्याचं म्हटलं आहे.
... त्यांचं आरोग्य उत्तमसकारात्मक कामाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगल असल्याचं समोर आलंय. ते कामात अधिक नाविन्यपूर्ण आणि कामाची उच्च कार्यक्षमता दाखवतात. बहुतेक लोकांसाठी दैनंदिन जीवनाचा बहुतेक वेळ कामावर खर्च होतो. हे कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्यांच्या शारीरिक मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर प्रभाव टाकण्याची संधी देते, असं मॅकिन्सेच्या सर्वेक्षणातून समोर आलंय.