वाॅशिंग्टन : जगभरात ट्विटरचे जवळपास निम्मे कर्मचारी घरी बसविल्यानंतर इलाॅन मस्क हे आता नाेकर भरतीची याेजना आखत आहेत. भारतातील जवळपास ९० टक्के कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर आता ते देशात नवी टीम उभारणार आहेत. ट्विटरचे डिसेंट्रलायझेशन करण्याची मस्क यांची याेजना आहे. महत्त्वाचे म्हणजे, मस्क यांनी ब्ल्यू टीक याेजनेचे रिलाँच थांबविले आहे.
भारतात ट्विटरचे सुमारे २०० हून अधिक कर्मचारी हाेते. त्यापैकी जवळपास १८० ते १९० कर्मचाऱ्यांना मस्क यांनी घरी बसविले. आता ते भारत, जपान, इंडाेनेशिया आणि ब्राझील येथे टीम उभारणार आहेत. साॅफ्टवेअर इंजिनीअर्सची भरती करण्यावर मस्क यांचा जाेर असू शकताे. जे कर्मचारी ट्विटरसाेबत अजूनही आहेत, त्यांना मस्क शेअर्स देणार आहेत. कर्मचारी कपात पुरे झाली, असे मस्क यांनी एका बैठकीमध्ये बाेलल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.