नवी दिल्ली : आता भारतीय लोक स्विस बँकांत नव्हे, तर आशियाई देशांत पैसे जमा करण्याला प्राधान्य देत असून, हाँगकाँग, सिंगापूर, मकाऊ, मलेशियासारख्या देशांतील बँकांत ५३ टक्के काळा पैसा ठेवला आहे.केंद्र सरकार व तपास यंत्रणांना स्विस बँकांतील काळ्या पैशाची माहिती मिळू लागल्यानंतर भारतीयांनीही काळा पैसा ठेवण्याच्या ठिकाणांत बदल केला आहे. भारतीयांचे २0१५ साली ४ लाख कोटी रुपये परदेशात जमा होते, असे बँक आॅफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स (बीआयएस)च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.परदेशात जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची रक्कम २0१५च्या देशाच्या जीडीपीच्या सुमारे ३ टक्के आहे. तसेच २00७ ते २0१५ या काळात परराष्ट्रात जमा असलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशांत ९0 टक्के वाढ झाली आहे.स्विस बँकांत २0१५मध्ये ३१ टक्के भारतीयांचा पैसा जमा झाला होता. केंद्र सरकारने मध्यंतरी स्विस बँकांमधील काळा पैसा परत आणण्यासाठी मोहीम उघडली. मात्र भारतीयांच्या काळ्या पैशाचा मोठा हिस्सा आशियाई ‘टॅक्स हेवन’मध्ये दडलेला आहे. भारताच्या दबावामुळे स्विस बँकांनी पैसे जमा करण्याच्या नियमांत पारदर्शकता आणली. त्यामुळेच लोकांनी आता आशियाई बँकेत पैसे जमा करण्याला प्राधान्य द्यायला सुरुवात केली, असे सांगण्यात येत आहे.भारत व अन्य देशांतील लोक काळा पैसा लपवण्यासाठी स्विस बँकांऐवजी आशियाई टॅक्स हेवन बँकांना प्राधान्य देत असल्याचे पनामा पेपर्समधून उघडकीस आले. काळा पैसा भारतात आणण्यासाठी सरकार गंभीर असेल, तर त्यांना स्विस बँकांबरोबरच आशियाई टॅक्स हेवन्स बँकांवरही लक्ष केंद्रित करावे लागेल.जीएफआयचा अहवालकाही दिवसांपूर्वी, २00५ ते २0१४ या काळात ७७0 अब्ज डॉलर काळ्या पैशाच्या स्वरूपात आले, असे ब्रिटनमधील ‘ग्लोबल फायनान्शिअल इंटेग्रिटी’ने (जीएफआय) म्हटले होते. जीएफआयने विकसनशील देशांतील बेकायदेशीर वित्तीय प्रवाह : २00५-२0१४ असा अहवाल दिला आहे. काळ्या पैशावर जारी झालेला हा जागतिक पातळीवरील पहिला अहवाल आहे. त्यात देशातून येणाºया आणि बाहेर जाणाºया काळ्या पैशाची नोंद आहे.
भारतीयांचा काळा पैसा आशियाई देशांतच, बीआयएसचा अहवाल; सिंगापूर, मलेशिया यांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:40 AM