Join us

भारतीय ग्राहकांचा चीनला झटका; टीव्ही बाजारपेठेत पहिल्यांदाच चीनी उत्पादन घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 8:01 AM

टीव्हीच्या बाजारपेठेत सध्या प्रचंड स्पर्धा आहे. अनेक ब्रँड्स अतिशय स्वस्तात नवे टीव्ही लाँच करत आहेत

नवी दिल्ली - आर्थिक आघाडीवर अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या चीनला भारतीय ग्राहकांनीही मोठा झटका दिला आहे. भारतीय टीव्ही बाजारपेठेतील चिनी ब्रँड्सची भागीदारी पहिल्यांदाच घटली आहे. ही घसरण अशीच चालू राहिल्यास चिनी टीव्ही उत्पादक कंपन्यांना भारतीय बाजारातून बाहेर पडावे लागू शकते, असे जाणकारांचे मत आहे. 

टीव्हीच्या बाजारपेठेत सध्या प्रचंड स्पर्धा आहे. अनेक ब्रँड्स अतिशय स्वस्तात नवे टीव्ही लाँच करत आहेत. त्यामुळे चिनी कंपन्यांना बाजारात पर्याय उपलब्ध झाले आहेत.

कारणे काय?इतर देशांच्या कंपन्यांनी भारतातील टीव्ही विक्रीच्या धोरणात बदल केला आहे. चिनी कंपन्या स्वस्तात टीव्ही विकतात. द. कोरियाच्या कंपन्यांनीही प्रवेश पातळीवरील टीव्हींच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे चिनी कंपन्यांना फटका बसला.

स्मार्टफोन बाजारातही चीनची घसरणभारतातील स्मार्टफोन बाजारातही ४ तिमाहींपासून चिनी ब्रँड्सचा वाटा घटला आहे. ७ हजार ते ८ हजार रुपये किमतीच्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये चिनी कंपन्यांचा दबदबा होता. मात्र, एलजी, सॅमसंग आणि सोनी यांनीही स्वस्त हँडसेट आणल्यामुळे चिनी कंपन्यांना फटका बसला आहे.