Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीयांनी शिक्षणावरील खर्च केला कमी, परदेशात फिरण्यावर दीड लाख काेटी खर्च! आरबीआयचा अहवाल

भारतीयांनी शिक्षणावरील खर्च केला कमी, परदेशात फिरण्यावर दीड लाख काेटी खर्च! आरबीआयचा अहवाल

भारतीयांनी सर्वााधिक खर्च परदेशात फिरण्यासाठी केला असून शिक्षणावरील खर्चात मात्र घट झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:56 AM2024-05-24T11:56:27+5:302024-05-24T11:57:35+5:30

भारतीयांनी सर्वााधिक खर्च परदेशात फिरण्यासाठी केला असून शिक्षणावरील खर्चात मात्र घट झाली आहे. 

Indians spend less on education, spend one and a half lakh crore on traveling abroad RBI report | भारतीयांनी शिक्षणावरील खर्च केला कमी, परदेशात फिरण्यावर दीड लाख काेटी खर्च! आरबीआयचा अहवाल

भारतीयांनी शिक्षणावरील खर्च केला कमी, परदेशात फिरण्यावर दीड लाख काेटी खर्च! आरबीआयचा अहवाल

नवी दिल्ली : भारतीयांनी गेल्या आर्थिक वर्षामध्ये परदेशात विक्रमी खर्च केला आहे.  ३१.७ अब्ज डाॅलर म्हणजे सुमारे २.६४ लाख काेटी रुपये भारतीयांनी परदेशात खर्च केले असून त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १७ टक्के जास्त आहे. भारतीयांनी सर्वााधिक खर्च परदेशात फिरण्यासाठी केला असून शिक्षणावरील खर्चात मात्र घट झाली आहे. 

आरबीआयच्या एका अहवालातून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. भारतीयांनी १.४२ लाख काेटी रुपये परदेशात फिरण्यासाठी खर्च केले. परेदशात केलेल्या खर्चापैकी हे प्रमाण ५३.६ टक्के आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षापेक्षा हा खर्च २४.५ टक्के जास्त आहे. काेराेनापूर्वीच्या आर्थिक वर्षात हे प्रमाण ३७ टक्के हाेते. काेराेनानंतर त्यात घट झाली हाेती. महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर हा खर्च वाढत गेला. शिक्षणासाठी पाठविण्यात येणाऱ्या पैशांमध्ये गेल्या दाेन वर्षांत ३३ टक्के घट झाली आहे.

परदेशातील गुंतवणूक वाढली
भारतीयांनी परदेशात माेठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यात प्रामुख्याने स्थावर मालमत्ता तसेच शेअर्समधील गुंतवणुकीत वाढ झाली आहे.

शिक्षणावरील खर्च ३३ टक्क्यांनी कमी
परदेशात शिक्षणासाठी हाेणारा खर्च २०२१-२२ नंतर सतत घटला आहे. परदेशात पाठविलेल्या एकूण पैशांपैकी २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३० टक्के खर्च शिक्षणावर हाेता. २०२२-२३ आर्थिक वर्षात ५.२ अब्ज डाॅलर शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यात आले हाेते. तर गेल्या आर्थिक वर्षात हा खर्च घटून ३.४ अब्ज डाॅलरवर आला. एकूण खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण १२ टक्के एवढेच आहे.

भारतीयांनी परदेशात एवढे पैसे पाठविले
वर्ष            रक्कम    वाढ
२०१९-२०        १८.८        १२.२% 
२०२०-२१        १२.७        ३२.४%
२०२१-२२        १९.६        ५४.३%
२०२२-२३        २७.१        ३८.२%
२०२३-२४        ३१.७        १७.९%
(रक्कम अब्ज डाॅलरमध्ये)

४.६ अब्ज डाॅलर भेटवस्तूंसाठी झाले खर्च
- भारतीयांनी शिक्षणाच्या तुलनेत परदेशातील नातेवाईकांना भेटवस्तू देण्यामध्ये जास्त खर्च केला आहे. ४.६ अब्ज डाॅलरच्या भेटवस्तू भारतीयांनी परदेशात दिल्या. 
- नातेवाईकांना राहण्यासाठी तसेच भेटवस्तूंसाठी दिलेल्या खर्चात २० टक्के वाढ झाली आहे.
- भेटवस्तूंवरील खर्चात गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे ८२ टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे.

Web Title: Indians spend less on education, spend one and a half lakh crore on traveling abroad RBI report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.