नवी दिल्ली : भारताची कॉफी निर्यात विपणन वर्ष २०१४ -२०१५ मध्ये किरकोळ घट होऊन ३,००,५२२ टन झाली, असे कॉफी बोर्डने सांगितले. निर्यात घटण्यास जागतिक पातळीवर कॉफीच्या कमी झालेल्या किमतीचाही समावेश आहे.आॅक्टोबर ते सप्टेंबर असे विपणन वर्ष असते. २०१३-२०१४ मध्ये ही निर्यात ३,०३,२५० टनांची होती. कॉफी बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आकडेवारीचा विचार केला तर ही निर्यात फारच कमी घटली आहे. विपणन वर्ष २०१४-२०१५ मध्ये किमतीच्या संदर्भात निर्यात वाढून ५,१४२ कोटी रुपयांची झाली. ती गेल्यावर्षी ४,९२० कोटी रुपयांची होती. जागतिक पातळीवर कॉफीच्या किमतीतील चढ-उतार व ब्राझील, इंडोनेशिया, व्हिएतनामसारख्या अनेक देशांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्यांच्या चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम व्यापारावर झाला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचेही मूल्य घसरल्यामुळे भारताची कॉफी निर्यात कमी झाली.
भारताची कॉफी निर्यात घटली
By admin | Published: October 23, 2015 2:50 AM