Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेला भारताची हिरे निर्यात वाढली

अमेरिकेला भारताची हिरे निर्यात वाढली

भारतातून अमेरिकेला होणाऱ्या रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:40 AM2019-05-08T04:40:13+5:302019-05-08T04:41:18+5:30

भारतातून अमेरिकेला होणाऱ्या रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे.

India's diamond exports | अमेरिकेला भारताची हिरे निर्यात वाढली

अमेरिकेला भारताची हिरे निर्यात वाढली

नवी दिल्ली : भारतातून अमेरिकेला होणाऱ्या रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये अमेरिकेला ८३०.८७३ कोटी डॉलरचे पैलू पाडलेल्या व पॉलिश हिऱ्यांची निर्यात केली गेली. ही आर्थिक वर्ष २०१७-२०१८ च्या ७६६.९८८ कोटी डॉलरच्या तुलनेत ८.३३ टक्के जास्त आहे, असे एका व्यावसायिक संघटनेने सांगितले.

रत्न आणि दागिने निर्यात संवर्धन परिषदेने निवेदनात म्हटले आहे की, भारताने २०१८-२०१९ मध्ये अमेरिकेला १५८.३३९ कोटी डॉलरच्या सोन्याच्या दागिन्यांची निर्यात केली होती. ती २०१७-२०१८ च्या १४६.९३९ कोटी डॉलरच्या तुलनेत ७.७६ टक्के जास्त आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल म्हणाले की, ‘‘अमेरिकेच्या बाजारात रत्न आणि दागिने उत्पादनांची भारताची निर्यात उत्साहजनक आहे.

, कारण अमेरिकेच्या जीडीपीत वाढ, रोजगार दराला वेग आणि वाढता खासगी उपभोग.
अंदाज असा आहे की, अमेरिकेच्या बाजारातील मागणीचा हा वेग पुढेही कायम राहील आणि त्यामुळे भारतीय रत्न आणि दागिने निर्यातीसाठी एक चांगला संकेतही समजला जात आहे. संघटनेच्या माहितीनुसार २०१८-२०१९ मध्ये अमेरिकन बाजाराच्या रत्न आणि दागिन्यांची १६ टक्क्यांपेक्षा जास्त मागणी भारताने पूर्ण केली होती.
 

Web Title: India's diamond exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.