Join us

भारतात वेगाने वाढतेय डिजिटल अर्थव्यवस्था, पण या बाजारातील त्रुटी दूर करण्याची गरज - सीसीआय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 1:22 PM

Digital Economy: भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (सीसीआय)चे प्रमुख अशोक कुमार गुप्ता यांनी सांगितले की, वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीदरम्यान, देशामध्ये डिजिटल बाजारातील त्रुटी त्वरित दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. 

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये भारत वेगाने डिजिटल अर्थव्यवस्था म्हणून समोर येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (सीसीआय)चे प्रमुख अशोक कुमार गुप्ता यांनी सांगितले की, वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीदरम्यान, देशामध्ये डिजिटल बाजारातील त्रुटी त्वरित दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. 

अशोक गुप्ता यांनी शनिवारी प्रतिस्पर्धा कायदा आणि अभ्यास विषयावर भारतीय उद्योग परिसंघ (सीआयई) आणि भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाकडून आयोजित वार्षिक संमेलनाला संबोधित करताना सांगितले की, वापरलेला डेटा आणि ऑनलाईन रियल इस्टेटवर नियंत्रणामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म ग्राहकांच्या पसंतीला आकार देण्याचा आणि प्रभावित करण्यासह त्यांना आपल्या व्यवसायांपर्यंत ओढण्याच्या अद्वितीय स्थितीमध्ये आहे.

ते पुढे म्हणाले की, भारत सर्वात मोठा आणि सर्वात वेगाने वाढत असलेला डिजिटल ग्राहक असलेला देश म्हणून समोर येत आहे. बाजारातील दोष त्वरित सुधारण्याची गरज आहे. यासंदर्भात प्रवर्तन आणि नीतीचे समाधान करण्यासाठी नियामक ढाचाची आवश्यकता आहे. ज्यामध्ये डिजिटल बाजाराच्या गुंतागुंतीची दखल घेण्यात आलेली आहे. 

त्यांनी सांगितले की, डिजिटल बाजारामध्ये घसरणीचीही जोखिम आहे. मात्र त्याचा सामना करण्याचा पद्धतींची वेगाने ओळख पटवणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, धोरण आखणारे आणि नियामकांसमोर बाजारामध्ये होत असलेल्या विकासाबाबज सजग राहण्याचे आव्हान आहे. तसेच हाती असलेली सर्व साधने विकसित करून गजरेनुसार दुरुस्त करत राहिली पाहिजेत. 

टॅग्स :व्यवसायऑनलाइनभारत