Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होईल भारत

१० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होईल भारत

भारतीय अर्थव्यवस्था नवी उंची गाठण्यासाठी तयार आहे. त्यासोबतच २०३० पर्यंत १० हजार अब्ज डॉलरच्या जीडीपीसह जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, असे मत आर्थिक विषयाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी व्यक्त केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:36 AM2018-07-16T00:36:06+5:302018-07-16T00:36:12+5:30

भारतीय अर्थव्यवस्था नवी उंची गाठण्यासाठी तयार आहे. त्यासोबतच २०३० पर्यंत १० हजार अब्ज डॉलरच्या जीडीपीसह जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, असे मत आर्थिक विषयाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी व्यक्त केले.

India's economy will grow to $ 10 billion | १० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होईल भारत

१० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होईल भारत

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था नवी उंची गाठण्यासाठी तयार आहे. त्यासोबतच २०३० पर्यंत १० हजार अब्ज डॉलरच्या जीडीपीसह जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, असे मत आर्थिक विषयाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी व्यक्त केले.
इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंट्सआॅफ इंडियाच्या हीरकोत्तर समारंभात ते बोलत होते. गर्ग म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर पहिल्या ४० वर्षांत देशाची आर्थिक वृद्धी मोठ्या मुश्किलीने ३ ते ४ टक्के होती. ती आज ७ ते ८ टक्के आहे. अर्थव्यवस्थेच्या पातळीवर चांगले काम होत आहे आणि ‘अच्छे दिन’ येणार आहेत. आमची अर्थव्यवस्था उंच झेप घेण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे भारत अभिमानाने आपली मान उंचावू शकतो.
गर्ग म्हणाले की, २०३० पर्यंत आम्ही १० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याची अपेक्षा करू शकतो. हे एक आव्हान आहे, तसेच आमच्यासाठी एक संधी आहे. ८ टक्के विकास दर गाठला जाऊ शकतो. जर आम्ही हे लक्ष्य साध्य केले, तर १० हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्याची अपेक्षा आम्ही करू शकतो. त्या वेळी भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असेल. भारताने फ्रान्सला मागे टाकून जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली असताना गर्ग यांंचे हे विधान आले आहे, हे विशेष.
।फ्रान्सला टाकले मागे
जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१७ मध्ये भारत २,५९० अब्ज डॉलरच्या जीडीपीसह सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. त्यामुळे फ्रान्स सातव्या स्थानावर गेला आहे. गर्ग म्हणाले की, २०२२ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था १,००० अब्ज डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, तर २०३० पर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था एकूण अर्थव्यवस्थेच्या अर्धी होईल.

Web Title: India's economy will grow to $ 10 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.