Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताचा चीनला दे धक्का! जगभरात 'हे' मेड इन इंडिया प्रॉडक्ट लोकप्रिय; निर्यातीत २८ टक्क्यांनी वाढ

भारताचा चीनला दे धक्का! जगभरात 'हे' मेड इन इंडिया प्रॉडक्ट लोकप्रिय; निर्यातीत २८ टक्क्यांनी वाढ

Electronics Exports : चीन अनेक उत्पादन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, आता भारतानेही आपण काही कमी नसल्याचे दाखवत मोठी झेप घेतली आहे. जगभरात मेड इन इंडिया वस्तू लोकप्रिय होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:09 IST2024-12-30T15:07:57+5:302024-12-30T15:09:33+5:30

Electronics Exports : चीन अनेक उत्पादन निर्मिती क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, आता भारतानेही आपण काही कमी नसल्याचे दाखवत मोठी झेप घेतली आहे. जगभरात मेड इन इंडिया वस्तू लोकप्रिय होत आहेत.

indias electronics exports surge 28 percent driven by smartphone boom | भारताचा चीनला दे धक्का! जगभरात 'हे' मेड इन इंडिया प्रॉडक्ट लोकप्रिय; निर्यातीत २८ टक्क्यांनी वाढ

भारताचा चीनला दे धक्का! जगभरात 'हे' मेड इन इंडिया प्रॉडक्ट लोकप्रिय; निर्यातीत २८ टक्क्यांनी वाढ

Electronics Exports : भारताचा शेजारी देश चीन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात जगभरात आघाडीवर आहे. याच जोरावर तो आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. पण, आता भारताने चीनला धोबीपछाड दिला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे केंद्र बनत आहे. देशात बनवलेली इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने देशांतर्गत मागणी तर पूर्ण करत आहेतच. पण त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यातही होत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत, भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात वार्षिक २८ टक्क्यांनी वाढून २२.५ अब्ज डॉलर्स झाली आहे. FY २४ च्या याच कालावधीत ते १७.६६ अब्ज डॉलर्स होते. या वाढीमुळे इलेक्ट्रॉनिक्स हे भारतातील पहिल्या १० निर्यात क्षेत्रांमध्ये सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. निर्यातीच्या बाबतीत अभियांत्रिकी उत्पादने आणि पेट्रोलियमनंतर इलेक्ट्रॉनिक्स आता तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. यापूर्वी ते सहाव्या स्थानावर होते. यातही एका प्रॉडक्टला तर जगभर पसंती मिळत आहे.

या क्षेत्रात आता भारताचा दबदबा राहणार
स्मार्टफोन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने चालवलेली प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना हिट ठरली आहे. आता देशात स्मार्टफोनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. Apple सारखी कंपनी भारतात आपले अनेक फोन तयार करत आहे. चालू आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात २०२४ च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४५% वाढीसह १३.११ अब्ज डॉलर्स झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा ९.०७ अब्ज डॉलर होता. एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत स्मार्टफोनचा वाटा आता ५८% इतका आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस हा वाटा ६०-६५% पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत मोठी झेप
इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत भारताने मोठी झेप घेतली आहे. ती आता पेट्रोलियम निर्यातीच्या निम्म्यापर्यंत पोहोचली आहे, जे मागील वर्षांच्या तुलनेत मोठं यश आहे. अमेरिकन बाजारपेठेत स्मार्टफोनच्या निर्यातीने आता हिऱ्यांच्या निर्यातीलाही मागे टाकले आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि निर्यात-नेतृत्वाच्या विकास मॉडेलला बळकटी देण्यासाठी सरकार दर संरचनेचा आढावा घेत आहे.

अ‍ॅपलचा मोठा प्रभाव
अ‍ॅपलचा भारतात प्रवेश आणि फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उत्पादकांनी स्मार्टफोन निर्यात नवीन उंचीवर नेली आहे. या वर्षी एकूण इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत अ‍ॅपलचे योगदान सुमारे ४०% आहे. स्मार्टफोन व्यतिरिक्त, देशाने बरेच सोलर मॉड्यूल्स, डेस्कटॉप आणि राउटर देखील निर्यात केले आहेत. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) चे म्हणणे आहे की चीन आणि व्हिएतनाम सारख्या देशांविरुद्ध स्पर्धात्मक राहण्यासाठी भारताला शुल्क आणि लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

 

Web Title: indias electronics exports surge 28 percent driven by smartphone boom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.