नवी दिल्ली : जागतिक मंदीचा फटका भारताच्या निर्यात व्यापाराला बसला असून, जून महिन्यात १५.८२ टक्के घट होऊन भारताचा निर्यात व्यापार २२.२८ अब्ज डॉलरवर आला. गेल्या सात महिन्यांपासून निर्यात व्यापारात घसरण होत असून, एकूण व्यापारातील तूट कमी होत १०.८२ अब्ज डॉलरवर आली आहे. कच्च्या तेलाचे भाव उतरल्याने पेट्रोलियम पदार्थांची निर्यात कमी झाली.
जून २०१४ मध्ये भारताच्या निर्यात व्यापाराचा आकडा २६.४७ अब्ज डॉलर होता. निर्यातीसोबत आयात व्यापारही २३.४० टक्क्यांनी घटला असून, जून २०१५ मध्ये भारताने ३३.११ अब्ज डॉलरचा आयात व्यापार केला होता.
प्रामुख्याने पेट्रोलियम उत्पादन, अभियांत्रिकी, चर्मोद्योग तसेच रासायनिक उद्योगांच्या निर्यातीत नकारात्मक वाढ झाली आहे. निर्यात व्यापारातील सातत्याने होणारी घट चिंतेची बाब असून, या घसरणीला आळा घालण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन निर्यातदारांनी केले आहे.
भारताची निर्यात घटली
जागतिक मंदीचा फटका भारताच्या निर्यात व्यापाराला बसला असून, जून महिन्यात १५.८२ टक्के घट होऊन भारताचा निर्यात व्यापार २२.२८ अब्ज डॉलरवर आला.
By admin | Published: July 16, 2015 04:44 AM2015-07-16T04:44:47+5:302015-07-16T04:44:47+5:30