Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताची निर्यात यंदा जाणार पाच वर्षांच्या नीचांकावर

भारताची निर्यात यंदा जाणार पाच वर्षांच्या नीचांकावर

चालू आर्थिक वर्षात भारताची निर्यात मोठी घटून पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाणार असल्याचे औद्योगिक क्षेत्रातील संघटना असोचेमने म्हटले आहे.

By admin | Published: September 20, 2015 11:29 PM2015-09-20T23:29:57+5:302015-09-20T23:29:57+5:30

चालू आर्थिक वर्षात भारताची निर्यात मोठी घटून पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाणार असल्याचे औद्योगिक क्षेत्रातील संघटना असोचेमने म्हटले आहे.

India's exports will drop to five-year low | भारताची निर्यात यंदा जाणार पाच वर्षांच्या नीचांकावर

भारताची निर्यात यंदा जाणार पाच वर्षांच्या नीचांकावर

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारताची निर्यात मोठी घटून पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाणार असल्याचे औद्योगिक क्षेत्रातील संघटना असोचेमने म्हटले आहे. जागतिक बाजारात मागणी घटल्यामुळे वस्तूंच्या किमती उतरल्या आहेत, त्याचा परिणाम होऊन भारताच्या निर्यातीत घट होत असल्याचे असोचेमच्या ताज्या अभ्यासात म्हटले आहे.
‘जागतिक बाजारात किमती घसरल्याच्या पार्श्वभूमीवर निर्यात स्थिती’ असे या अभ्यासाचे नाव आहे. त्यात असोचेमने म्हटले की, जगात कच्चे तेल, धातू, कोळसा, तांबे आणि खाद्य तेलाच्या किमती घसरत आहेत. मागणीत घट झाल्यामुळे वस्तू बाजारात सट्टेबाजांची चलती बंद होत आहे. केवळ वास्तविक मागणीपुरताच वस्तूंचा खप सुरू आहे.
असोचेमने म्हटले की, चालू आर्थिक वर्षात भारताची निर्यात २६५ ते २६८ अब्ज डॉलर इतकी असेल. गेल्या पाच वर्षांतील हा नीचांक असेल. गेल्या आर्थिक वर्षात ३१0 अब्ज डॉलरची निर्यात भारताने केली होती.
२0११-१२ मध्ये ३00 अब्ज डॉलर तर २0१३-१४ मध्ये ३१४ अब्ज डॉलरची निर्यात भारताने केली होती. भारतातून प्रामुख्याने इंजिनिअरिंग साहित्य, लोह खनिज, पोलाद व इतर धातू यांची निर्यात होते. या सर्वच वस्तूंच्या किमतीत घट झाली
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: India's exports will drop to five-year low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.