Join us

मोदी सरकारला धक्का! परकीय चलन साठ्यापेक्षा विदेशी कर्ज अधिक, पोहोचलं ६०० अब्ज डॉलर्स पार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 4:03 PM

भारताचं दीर्घ कालावधीचं कर्ज ४९९.१ अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे. हे एकूण विदेश कर्जाच्या ८०.४ टक्के इतकं आहे.

मार्च २०२२ अखेर भारताचे विदेशी कर्ज एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ८.२ टक्क्यांनी वाढून ६२०.७ अब्ज डॉलर्स इतके झाले. शुक्रवारी अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाच्या या विदेशी कर्जापैकी ५३.२ टक्के हिस्सा हा अमेरिकन डॉलरच्या रूपात आहे, तर भारतीय रुपयाच्या रूपात देय कर्ज ३१.२ टक्के आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार सध्या विदेशी कर्जाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत विदेशी कर्ज हे देशाच्या परकीय चलन साठ्यापेक्षा अधिक झाले आहे.

भारताचे विदेशी कर्ज व्यवस्थितपणे व्यवस्थापित केले जात असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. मार्च २०२२ अखेर हे कर्ज ६२०.७ अब्ज डॉलर्स इतके झाले. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत यात ८.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असेही अहवालात सांगण्यात आले आहे. सध्या देशावर ४९९.१ अब्ज डॉलर्सचे दीर्घकालीन क आहे. हे एकूण विदेशी कर्जाच्या ८०.४ टक्के आहे. तर १२१.७ अब्ज डॉलर्सचे कमी कालावधीचे कर्ज आहे. ते एकूण कर्जाच्या १९.६ टक्के असल्याचेही यात नमूद करण्यात आलेय.

सॉवरेन डेट (Sovereign Debt) एका वर्षाच्या तुलनेत १७.१ टक्क्यांनी वाढून १३०.७ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. तर नॉन सॉवरेन डेट ६.१ टक्क्यांनी वाढू ४९० डॉलर्स झाले आहे. रिपोर्टनुसार एनआरआय यांच्या ठेवी दोन टक्क्यांनी कमी होऊन १३९ अब्ज डॉलर्सवर पोहोचल्या आहेत. तर कमर्शिअल बॉरोईंग ५.७ टक्क्यांनी वाढून२०९.७१ अब्ज डॉलर्ससवर पोहोचले. शॉर्ट टर्म ट्रेड क्रेडिट २०.५ टक्क्यांनी वाढून ११७.४ अब्ज डॉलर्स इतके राहिले आहे.

टॅग्स :भारतनरेंद्र मोदीनिर्मला सीतारामन