Join us

भारतात 'या' बिझनेसची गरूड भरारी; ५० हजार कोटींची परदेशी गुंतवणूक, संधी गमावू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 1:53 PM

गुंतवणूक आणि व्यापार यावर लक्ष केंद्रीत करून गोलमेज संमेलनही होतील त्यात भारतीय खाद्य प्रक्रिया उद्योगाला नवी ऊर्जा देण्यासाठी चालना दिली जाईल.

नवी दिल्ली – मोदी सरकार स्वयंरोजगाराला मोठ्या प्रमाणात चालना देत आहे. त्यामुळे देशात नवनवीन स्टार्टअप उद्योग तयार होतायेत. मागील ९ वर्षात देशात अनेक युवा उद्योजक तयार झालेत. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्यात. खाद्य प्रक्रिया उद्योग हे क्षेत्र उभरत्या उद्योगांपैकी एक आहे. ९ वर्षात यात जवळपास ५० हजार कोटींची परदेशी गुंतवणूक आली आहे. ही छोटी रक्कम नाही. त्यामुळे देशात फूड प्रोसेसिंग बिझनेस किती वेगाने वाढतोय त्याचा अंदाज येऊ शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतात खाद्य प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. अशात तुम्ही बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर या क्षेत्रात तुम्ही नशीब आजमावून मोठी कमाई करू शकता. राजधानी दिल्लीत भारत मंडपममध्ये वर्लड फूड इंडिया आयोजित करण्यात आला आहे. मागील ९ वर्षात या क्षेत्रात ५० हजार कोटींची परदेशी गुंतवणूक आलीय. सरकारच्या उद्योग आणि शेतकरी धोरणामुळे हे घडलंय. खाद्य निर्यात १५० टक्के वाढले आहे. भारताला जगातील विविध खाद्य संस्कृतीचं माहेरघर म्हणून पुढे आणायचे आहे असं त्यांनी सांगितले.

तर मोदी सरकार खाद्य सुरक्षा आणि खाद्य प्रक्रिया क्षेत्राला चालना देत आहे. फूड स्ट्रीटमध्ये अनेक प्रादेशिक खाद्य संस्कृतीचा वारसा सहभागी आहे. ज्यात २०० हून अधिक शेफ भाग घेतील. सरकारी संस्था, उद्योजक, शेतकरी यांच्या हितासाठी भागीदारी करत कृषी खाद्य क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी याला व्यासपीठ दिले जात आहे असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं.

८० पेक्षा अधिक देशांनी घेतला भाग

गुंतवणूक आणि व्यापार यावर लक्ष केंद्रीत करून गोलमेज संमेलनही होतील त्यात भारतीय खाद्य प्रक्रिया उद्योगाला नवी ऊर्जा देण्यासाठी चालना दिली जाईल. भारत मंडपममधील हे आयोजन खाद्य प्रक्रिया उद्योगातील विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी ४८ परिसंवाद ठेवले आहेत. ज्यात आर्थिक सशक्तीकरण, गुणवत्ता, मशिनरी आणि स्टार्टअपवर जोर दिला जाईल. या आयोजनात खाद्य प्रक्रिया कंपन्यांच्या सीईओसह ८० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. त्यात ग्राहक आणि खरेदीदार यांची एक बैठक होईल. यात १२०० हून अधिक परदेशी गुंतवणूकदार उपस्थित राहतील.

टॅग्स :अन्ननरेंद्र मोदी