Join us

भारताचा परकीय चलन साठा $675 अब्जच्या ऑल टाईम हायवर; एका आठवड्यात $8 अब्ज वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 6:38 PM

RBI MPC Meeting: आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली.

Foreign Exchange Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. 2 ऑगस्ट 2024 रोजी, म्हणजेच मागील आठवड्यात परकीय चलनाचा साठा पहिल्यांदाच $675 अब्जच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. त्यापूर्वी हा $667.38 अब्जवर होता. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 50 व्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

दार म्हणाले की, 2 ऑगस्ट 2024 रोजी भारताचा परकीय चलन साठा $675 अब्जच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. म्हणजेच, 26 जुलै ते 2 ऑगस्ट, या आठ दिवसात परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे 8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 26 जुलै 2024 रोजी परकीय चलन साठा $667.38 अब्ज होता. एकूणच भारताचे बाहेरील क्षेत्र गतिमान आहे, कारण प्रमुख निर्देशकांमध्येही सातत्याने सुधारणा होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आमच्या बाह्य वित्तपुरवठा गरजा मोठ्या सहजतेने पूर्ण करू शकू.

ते पुढे म्हणाले की, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जून 2024 ते ऑगस्ट 6 दरम्यानदेशांतर्गत बाजारात $9.7 अब्जची खरेदी केली आहे, तर एप्रिल आणि मे या कालावधीत $4.2 अब्जचा आउटफ्लो दिसून आला आहे. 2024-25 या कालावधीत थेट परकीय गुंतवणुकीतही वाढ झाली आहे. एप्रिल-मे 2025 दरम्यान सकल एफडीआयमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे, तर निव्वळ एफडीआय गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत दुप्पट वाढला आहे.

तीन दिवस चाललेल्या आरबीआयच्या 50 व्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, रेपो दर 6.50 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. सहा सदस्यीय एमपीसीमध्ये 4 सदस्यांनी रेपो दर सध्याच्या पातळीवर ठेवण्याच्या बाजूने मतदान केले, तर दोन सदस्यांनी रेपो दरात कपात करण्याच्या बाजूने मतदान केले.

टॅग्स :भारतभारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास