Join us  

भारताची इंधन मागणी ६.२ टक्क्यांनी वाढली

By admin | Published: July 14, 2016 3:34 AM

भारताची इंधनाची मागणी जूनमध्ये ६.२ टक्क्यांनी वाढली आहे. तेल मंत्रालयातील ‘पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनॅलिसिस सेल’च्या वतीने ही माहिती देण्यात आली.

नवी दिल्ली/चंदीगड : भारताची इंधनाची मागणी जूनमध्ये ६.२ टक्क्यांनी वाढली आहे. तेल मंत्रालयातील ‘पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनॅलिसिस सेल’च्या वतीने ही माहिती देण्यात आली.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये भारताची एकूण तेल मागणी १५.६५ दशलक्ष टन राहिली. जूनमध्ये पेट्रोलचा खप ४.४ टक्क्यांनी वाढला. १.८५ दशलक्ष टन पेट्रोलची विक्री झाली. स्वयंपाकाचा गॅस म्हणजे एलपीजीचा खप ८.५ टक्क्यांनी वाढून १.६१ दशलक्ष टनांवर गेला. नाफ्ताचा खप १५.६ टक्क्यांनी वाढून १.१९ दशलक्ष टन झाला. रोडसाठी वापरण्यात येणाऱ्या डांबराचा खप १0.0 टक्क्यांनी तर इंधन तेलाचा खप १७.३ टक्क्यांनी वाढला. ‘एक देश, एक दर’ हे धोरण लागू करण्याची मागणी देशातील पेट्रोल पंप मालकांच्या संघटनेने केली आहे. विविध राज्यांत सध्या पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी तफावत आहे. ती दूर करण्याची मागणी संघटनेने केली आहे. (वृत्तसंस्था)आॅल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी सांगतिले की, पेट्रोल-डिझेलचे दर संपूर्ण देशात एकसमान असावेत, यासाठी आम्ही ‘एक देश, एक दर’ हे धोरण लागू करण्याची मागणी करीत आहोत. या धोरणामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर नियंत्रण ठेवणेही शक्य होणार आहे. प्रत्येक राज्यांत व्हॅटचा दर भिन्न आहे. त्यामुळे सध्या पेट्रोलच्या दरात ६0 पैसे ते ४ रुपयांची तफावत आहे, तसेच डिझेलच्या दरात १ ते ७.५0 रुपयांची तफावत आहे.