Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताचा जी-२० प्रवेश आशियाच्या पथ्यावर, एफडीआयतील भागीदारी वाढली

भारताचा जी-२० प्रवेश आशियाच्या पथ्यावर, एफडीआयतील भागीदारी वाढली

भारताचा जी-२० या जगातील सर्वाधिक सक्षम आर्थिक राष्ट्रांच्या गटात झालेला समावेश संपूर्ण आशियाच्या पथ्यावर पडला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 02:19 AM2017-12-04T02:19:07+5:302017-12-04T02:20:09+5:30

भारताचा जी-२० या जगातील सर्वाधिक सक्षम आर्थिक राष्ट्रांच्या गटात झालेला समावेश संपूर्ण आशियाच्या पथ्यावर पडला आहे.

India's G-20 entry on Asian path, increased FDI participation | भारताचा जी-२० प्रवेश आशियाच्या पथ्यावर, एफडीआयतील भागीदारी वाढली

भारताचा जी-२० प्रवेश आशियाच्या पथ्यावर, एफडीआयतील भागीदारी वाढली

चिन्मय काळे
मुंबई : भारताचा जी-२० या जगातील सर्वाधिक सक्षम आर्थिक राष्ट्रांच्या गटात झालेला समावेश संपूर्ण आशियाच्या पथ्यावर पडला आहे. भारताच्या या प्रवेशानंतर जागतिक थेट विदेशी गुंतवणुकीतील (एफडीआय) आशियाची भागीदारी ७ टक्के वाढल्याचे सीआयआयच्या अहवालात समोर आले आहे.
भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) जागतिक बहुआयामी व्यापारासंबंधीचा अहवाल अलीकडेच जारी केला. त्यामध्ये प्रामुख्याने जी-२० ला घेऊन आशियाई विकास बँक (एडीबी), जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ), आंतरराष्टÑीय व्यापार केंद्र (आयटीसी) यांनी आशियातील देशांमध्ये सुरू केलेल्या वित्तीय कामांचा आढावा घेण्यात आला.
या आधी जागतिक एफडीआयमधील आशियाची भागीदारी ४८ टक्के होती. आता जी-२० त भारताच्या समावेशानंतर ही भागीदारी ५५ टक्के झाली आहे. जगभरात एफडीआयमध्ये ६ टक्के घट होत असताना, आशियाई देशांमधील आंतरप्रदेश एफडीआयमध्ये वाढ होऊन, ती २७२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. मागील पाच वर्षे सरासरी ५५.९
टक्के असणारा आशियातील आंतरप्रदेश एफडीआय वर्षभरात ५७.३ टक्के राहिला. एकूणच जगभरात सर्वत्र मंदीसदृश्य वातावरण असले, तरी आशियाचे जागतिक व्यवसायातील स्थान सातत्याने
वाढत आहे. आशियातून बाहेर जाणाºया एफडीआयमध्ये ११ टक्के वाढ होऊन, ती ४८२ अब्ज
डॉलरवर पोहोचली आहे, असे या अहवालात नमूद झाल्याने,
भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर नावलौकिकाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

‘भारताच्या समावेशानंतर जी-२० हा स्थिर जागतिक विकासाचा सर्वात सक्षम गट ठरला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला नवी चालना व आकार देण्यात भारत हे सर्वाधिक प्रभावशाली राष्टÑ बनत आहे. जी-२० च्या पुढील दिशा व भारतासमोर त्या दृष्टीने असलेला प्राधान्यक्रम या अहवालात नमूद करण्यात आला आहे.’
- चंद्रजित बॅनर्जी
महासंचालक, सीआयआय.

Web Title: India's G-20 entry on Asian path, increased FDI participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत