नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती तथा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सांगितले की, येत्या सात वर्षांत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन दुपटीने वाढून ५ लाख कोटी डॉलर होईल, तसेच २0३0 पर्यंत ते १0 लाख कोटी डॉलरवर जाईल. २१ व्या शतकाच्या मध्यास भारत चीनला मागे टाकील.रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या मुकेश अंबानी यांनी येथे आयोजित एका नेतृत्व शिखर परिषदेत सांगितले की, २00४ मध्ये आपण भारताची अर्थव्यवस्था २0 वर्षांत ५00 अब्ज डॉलरची होईल, असे भाकीत केले होते. आज आपले हे भाकीत खरे ठरत आहे. २0२४ पूर्वीच भारत ही कामगिरी करील. आगामी १0 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ७ लाख कोटी डॉलरची होईल. त्याबरोबर जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मानही भारताला मिळेल. २0२0 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था १0 लाख कोटी डॉलरचा मैलाचा दगड पार करील.अंबानी म्हणाले की, या शतकात भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक भरभराट असलेली अर्थव्यवस्था बनेल. २१ व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारताचा वृद्धीदर चीनपेक्षा जास्त असेल, तसेच तो जगातील सर्वाधिक आकर्षक दरही असेल. भारत जगाला सर्वांत चांगले आणि सर्वथा वेगळे विकास प्रतिमान (डेव्हलपमेंट मॉडेल) देईल. तंत्रज्ञान, लोकशाही, उत्तम अभिशासन आणि सामाजिक सांस्कृतिक समानाभूतीवर आधारित असलेले हे प्रतिमान समन्याय आणि समावेशी वृद्धी निर्माण करील.जिओमुळे ब्रॉडबॅण्डमध्ये भारत अव्वलजिओमुळे भारतीय मोबाइल ब्रॉडबॅण्ड युझर्सने अमेरिका व चीनला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.‘मोबाइल ब्रॉडबॅण्डमध्ये भारताचा क्रमांक वर्षभरापूर्वी १५० वा होता. तो आता पहिला आहे. मोबाइल ब्रॉडबॅण्ड डेटा हाच पुढील काळ असेल, तर नवीन भारत या काळाचा अंगीकार करण्यास सज्ज आहे’, असे अंबानी म्हणाले.चौथ्या औद्योगिक क्रांतीत नेतृत्वाची संधीच्‘भारत जागतिक आर्थिक नेता बनणार’ या विषयावर दिलेल्या व्याख्यानात अंबानी यांनी सांगितले की, पहिल्या औद्योगिक क्रांतीत कोळसा आणि वाफेचा ऊर्जा म्हणून उपयोग केला गेला. दुसºया औद्योगिक क्रांतीत वीज आणि तेलाचा वापर झाला, तर तिसरीत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटीचा वापर झाला. पहिल्या दोन औद्योगिक क्रांतींमध्ये भारत कुठेच नव्हता. भारताने थेट तिसरी संगणकावर आधारित क्रांती पकडायला सुरुवात केली.आता चौथी औद्योगिक क्रांती सुरू आहे. कनेक्टिव्हिटी, कॉम्प्युटिंग, डाटा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा चौथ्या क्रांतीचा पाया आहे. माझा ठाम विश्वास आहे की, भारत या क्रांतीत नुसताच सहभागी होणार नाही, तर भारताला या क्रांतीचे नेतृत्व करण्याची संधी आहे.
सात वर्षांत भारताचा जीडीपी दुप्पट होणार - मुकेश अंबानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 1:13 AM