Join us

देशातील बेरोजगारी वाढली; जीडीपीत मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 7:21 PM

केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केल्यानुसार देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपीत घसरण झाली आहे. 

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट बातमी आली आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केल्यानुसार देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपीत घसरण झाली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 च्या चौथ्या तिमाहित देशाच्या विकास दरात घट झाली आहे. 

जानेवारी ते मार्चच्या तिमाहित आर्थिक विकासदर घसरून 5.8 टक्क्यांवर आला आहे, तर मार्च 2018 ते मार्च 2019 या आर्थिक वर्षाचा विकासदर 6.8 टक्क्यांवर आला आहे. गेल्या नऊ महिन्यात देशातील कृषी, उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग यासारख्या क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे जीडीपी दरात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

दरम्यान, लेबर सर्व्हेनुसार, गेल्या आर्थिक वर्षात देशातील बेरोजगारी दर 6.1 टक्के इतका आहे. बेरोजगारीची ही टक्केवारी गेल्या 45 वर्षातली सर्वाधिक असल्याचेही समोर आले आहे. 2017-18 या वर्षात बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षातला सर्वाधिक असल्याचे यावरुन होत आहे. 

 

टॅग्स :व्यवसाय