Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताच्या GDP मध्ये वाढ झाली! चौथ्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के होता; ८% च्या पुढे गेला

भारताच्या GDP मध्ये वाढ झाली! चौथ्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के होता; ८% च्या पुढे गेला

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत भारताचा GDP वाढीचा दर ७.८ टक्के होता. तेच पूर्ण वर्षासाठी जीडीपी वाढ ८.२ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 07:13 PM2024-05-31T19:13:52+5:302024-05-31T19:18:47+5:30

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत भारताचा GDP वाढीचा दर ७.८ टक्के होता. तेच पूर्ण वर्षासाठी जीडीपी वाढ ८.२ आहे.

India's GDP increased The growth rate in the fourth quarter was 7.8 percent went beyond 8% | भारताच्या GDP मध्ये वाढ झाली! चौथ्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के होता; ८% च्या पुढे गेला

भारताच्या GDP मध्ये वाढ झाली! चौथ्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के होता; ८% च्या पुढे गेला

भारताच्या जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपीची वाढ ६.२ टक्के होती. दरम्यान, आता संपूर्ण आर्थिक वर्षासाठी वास्तविक जीडीपी वाढ ८.२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काही दिवसापूर्वी अनेक रेटींग एजन्सींनी चौथ्या तिमाहीत भारताचा विकास दर ६.७ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता.

Gold Silver Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एवढ्या हजारांनी स्वस्त झालं सोनं; चांदी २६८७ रुपयांनी घसरली

भारताचे तिसऱ्या तिमाहीतील विकास दराच्या आकडे झपाट्याने वाढले आहेत. ८.४ टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. अनेक आर्थिक तज्ज्ञांनी विकासदर ७ टक्के असेल असा अंदाज वर्तवला होता.  

२०२२-२३ या वर्षाच्या जानेवारी-मार्च कालावधीत देशाचा जीडीपी  ६.२ टक्क्यांनी वाढले होते. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जीडीपी वाढ ७ टक्के होती. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अर्थव्यवस्था ८.२ टक्क्यांनी वाढली. दुसऱ्या अंदाजानुसार, NSO ने २०२३-२४ साठी देशाचा विकास दर ७.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळीच चीनने २०२४ च्या पहिल्या तीन महिन्यांत ५.३ टक्के आर्थिक वाढ नोंदवली आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जीडीपीशी संबंधित नवीन डेटा जारी केला आहे. यानुसार, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी वाढीचा दर रिझर्व्ह बँकेचा अंदाज ६.९ टक्के ओलांडला आहे.

Web Title: India's GDP increased The growth rate in the fourth quarter was 7.8 percent went beyond 8%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.