India GDP Data : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज वाढवला आहे. IMF ने चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP 20 बेसिस पॉईंट्सच्या वाढीसह 7 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये IMF ने GDP 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
...यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 16 जुलै 2024 रोजी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ग्रोथ प्रोजेक्शन जारी केले आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 6.8 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे IMF ने म्हटले आहे. याशिवाय, ग्रामीण भागात खाजगी खप वाढल्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग येऊ शकतो. तर, 2025-26 या आर्थिक वर्षात हा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज असेही IMF ने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, 2023-24 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.2 टक्के होता.
RBI चा अंदाजजून महिन्यात आरबीआयने आपला अंदाज 7 टक्क्यांवरून 7.0 टक्के केला होता. आरबीआयचा अंदाज आयएमएफच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते 2024-25 मध्ये भारताचा GDP 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या महिन्यातच RBI गव्हर्नर म्हणाले होते की, भारत वार्षिक 8 टक्के विकास दर गाठण्याच्या मार्गावर आहे आणि हे दीर्घकाळ चालू राहू शकते.