नवी दिल्लीः आशियाई विकास बँक(एडीबी)नं वित्त वर्ष 2019-20मध्ये देशाच्या आर्थिक वृद्धीच्या दराच्या अंदाजात कपात केली असून, 6.50 टक्क्यांवरून 5.10 टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी सप्टेंबर आणि जुलैमध्ये आशियाई विकास बँकेनं भारताचा विकासदराचं अंदाज कमी केला होता. एडीबीनं 2019-20ला सप्टेंबरमध्ये भारताचा आर्थिक विकासदर 6.5 टक्के दाखवला होता, त्यानंतर तोच विकासदराचा अंदाज 7.2 टक्क्यांवर येण्याची शक्यता वर्तवली होती.यासंदर्भात एडीबीनं ग्रामीण भागात पावसानं हातची वाया गेलेली पिकं आणि रोजगारात होत असलेली कपातीनं अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. त्यामुळेच वृद्धीदराचा अंदाज घटवण्यात आला आहे. तसेच सरकारच्या अनुकूल धोरणांमुळे आर्थिक वृद्धीदर पुढच्या वित्त वर्षांत 6.5 टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज होता. पण तो आता घटवण्यात आला आहे. पाच डिसेंबर 2019ला आरबीआयनं जीडीपीचा अंदाज घटवलेला होता. केंद्रीय बँकेनुसार वर्षं 2019-20मध्ये जीडीपीमध्ये घट झालेली होती, त्यावेळी तो 6.1 टक्क्यांवरून घसरून पाच टक्क्यांवर आला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला होता.
भारताच्या जीडीपीत होणार आणखी घसरण; एडीबीनं घटवला विकासदराचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 3:30 PM