नवी दिल्ली : मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस या रेटिंग एजन्सीने भारताचा विकास दर आणखी खाली येईल, असा अंदाज व्यक्त केला. मूडीजने आधी भारताचा विकास दर ५.८ टक्के असेल, असे म्हटले होते. पण त्यात 0.२ टक्क्यांची घट करून विकास दर ५.६ टक्के इतकाच असेल, असे म्हटले आहे.२0१८ च्या मध्यापासून भारतात आर्थिक हालचाली मंदावल्या आहेत. वाढत्या बेराजगारीचाही परिणाम होत असून, मागणीअभावी कारखान्यांमधील उत्पादनात घट होते आहे. परिणामी अनेक क्षेत्रांची अवस्था अतिशय वाईट आहे. मुडीजने म्हटले आहे की, आर्थिक मंदीवर उपाययोजना करण्यात हवे तितके यश भारताला आल्याचे दिसत नाही. तसेच कर्जाचा बोजाही वाढला आहे. मात्र अर्थव्यवस्थेचा ढाचा मजबूत आहे व अलीकडेच केलेल्या सुधारणांमुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल. गैर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या अडचणी, वाहने व घरांच्या विक्रीमध्ये झालेली घट,मोठ्या उद्योगांना करावा लागणारा संकटांचा सामना पाहता भारताच्या विकास दराच्या अंदाजात सातत्याने घट केली जात आहे.>पुढील दोन वर्षांत वाढ शक्यविकास दरात न होणारी वाढ आणि कॉर्पोरेट करात कपात केल्याने महसुलामध्ये होणारी कपात यांमुळे वित्तीय तुटीचा सामना भारताला करावा लागेल, असे दिसत आहे. मूडीजने २0१८ मध्ये ७.४ टक्के विकास दराचा अंदाज वर्तविला होता. आता २0२0 मध्ये विकास दर ६.६ व २0२१ मध्ये ६.७ असेल, असे मूडीजच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताचा विकास दर ५.६ टक्केच राहण्याची शक्यता; मूडीजचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 4:04 AM