नवी दिल्ली : येत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर २०१९-२०मध्ये ती ७.५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज जागतिक मानक संस्था ‘फिच’ने व्यक्त केला आहे.
फिचने आपल्या ‘जागतिक आर्थिक दृष्टिक्षेप’ या अहवालात ही माहिती दिली आहे. येत्या आर्थिक वर्षात ती ६.५ टक्क्यांनी वाढेल, असे फिचने म्हटले आहे. केंद्राच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने ६.६ टक्के वृद्धीदर गृहीत धरला आहे. त्यापेक्षा फिचचा अंदाज कमी आहे. सन २०१६-१७मध्ये वृद्धीदर ७.१ टक्के होता. वृद्धीवर परिणाम करणाऱ्या एका धोरणाशी संबंधित घटकाचा परिणाम आता ओसरला आहे. त्यामुळे वृद्धीदरात वाढ होण्याची शक्यता आहे, असे फिचने म्हटले आहे. अमेरिका, युरोझोन आणि चीनमुळे जागतिक वृद्धीही चांगली राहील, असे फिचने नमूद केले आहे. सन २०१९पर्यंत सलग तीन वर्षे जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ३ टक्के राहील. २०००च्या मध्यानंतर ही कामगिरी करणे जागतिक अर्थव्यवस्थेला शक्य झाले नव्हते, असे फिचने म्हटले आहे.
भारताचा वृद्धीदर ७.३ टक्के होणार, ‘फिच’चा अहवाल
येत्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर २०१९-२०मध्ये ती ७.५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज जागतिक मानक संस्था ‘फिच’ने व्यक्त केला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:16 AM2018-03-16T01:16:57+5:302018-03-16T01:16:57+5:30