न्यूयॉर्क : २0१८-१९ मध्ये भारताच्या सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धीदर ७.३ टक्के असेल, तर त्यापुढील वर्षांत म्हणजेच २0१९-२0 मध्ये तो ७.५ टक्के होईल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. नाणेनिधीने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, पुढील वित्त वर्षापर्यंत भारतातील गुंतवणूक मजबूत होईल. खासगी उपभोगही वाढेल. त्याचा परिणाम म्हणून वृद्धीदर गतिमान हाईल. २0१८-१९ मध्ये महागाईचा दर ५.२ टक्के राहील. रुपयाची घसरण, इंधनाच्या वाढत्या किमती, घरभाडे भत्त्यातील वाढ व कृषीमालाच्या किमान आधारभूत किमतीत केलेल्या वाढीचा परिणाम महागाईवर होईल.भारत सध्या जुळ्या ताळेबंद समस्येने (टिष्ट्वन बॅलन्सशीट प्रॉब्लेम) ग्रस्त आहे. यावर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केंद्र सरकारने नुकत्याच हाती घेतल्या आहेत. बँकांमध्ये काही सुधारणा केल्या जात आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्राचा भांडवल पुरवठा वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.>वित्तीय तूट वाढणे अपरिहार्यअहवालात म्हटले की, चालू खात्यातील तूट वाढून २.६ टक्के होईल. वाढत्या मागणीमुळे देशाची आयात वाढेल व जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्यामुळे भारताचा आयातीवरील खर्चही वाढेल. याचा परिणाम म्हणून चालू खात्यातील तूट वाढणे अपरिहार्य आहे.
२0१९-२० मध्ये भारताचा वृद्धीदर ७.५ टक्के होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 3:04 AM