नवी दिल्ली : भारताचा ‘जीडीपी’ वाढीचा दर सन २०१८-१९ या आगामी वर्षात वाढून ७.३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल व त्या पुढील वर्षात विकासाला आणखी गती येऊन दर ७.५ टक्के होऊ शकेल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट: इंडियाज ग्रोथ स्टोरी’ हा जागतिक बँकेचा द्वैवाषिक अहवाल बुधवारी प्रसिद्ध झाला. त्यात येत्या ३१ मार्च रोजी संपलेल्या चालू वित्तीय वर्षात भारताचा विकास दर ६.७ टक्क्यांवर स्थिरावण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली. नोटाबंदी व जीएसटीची अंमलबजावणीमुळे आलेल्या मंदीतून भारतीय अर्थव्यवस्था हळहळू बाहेर येऊन ७.५ टक्के विकासदराच्या जवळपास पोहोचू शकेल. मात्र, यासाठी आर्थिक सुधारणांची व्याप्तीही वाढवावी लागेल, असेही हा अहवाल म्हणतो.
पुढील वर्षी वाढेल भारताचा विकासदर
भारताचा ‘जीडीपी’ वाढीचा दर सन २०१८-१९ या आगामी वर्षात वाढून ७.३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल व त्या पुढील वर्षात विकासाला आणखी गती येऊन दर ७.५ टक्के होऊ शकेल, असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:45 AM2018-03-15T00:45:33+5:302018-03-15T00:45:33+5:30