Join us

भारताचे इंटरनेट जपान, इंग्लंडपेक्षाही सुसाट; ५-जी आल्यानंतर गती ३.५९ पटींनी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 7:35 AM

५ जी आल्यानंतर भारतातील इंटरनेट स्पीडमध्ये मोठी सुधारणा झाली .

नवी दिल्ली : ५ जी आल्यानंतर भारतातील इंटरनेट स्पीडमध्ये मोठी सुधारणा झाली असून याबाबतीत भारताने ११९व्या स्थानावरून थेट ४७व्या स्थानी झेप घेतली आहे. जपान, ब्रिटन आणि ब्राझील यांसारख्या अनेक बड्या देशांना भारताने मागे टाकले आहे. ब्रॉडबँड आणि मोबाईल इंटरनेट नेटवर्कच्या गतीची माहिती देणारी कंपनी ‘ओकला’ने ही माहिती जारी केली आहे.

भारतात ५ जी दूरसंचार सेवा सुरू झाल्यापासून मोबाईल इंटरनेटच्या गतीत ३.५९ पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये भारतातील सरासरी डाऊनलोड गती १३.८७ एमबीपीएस होती.

७२ स्थानांची झेप

भारत   ४७

दक्षिण आफ्रिका  ४८

ब्राझील  ५०

जपान          ५८

ब्रिटन   ६२

तुर्कस्तान       ६८

मेक्सिको ९०

टॅग्स :५जी