सिंगापूर : चीनला मागे टाकून भारत द्रवरूप पेट्रोलियम गॅसचा (एलपीजी) सर्वांत मोठा आयातदार देश बनणार आहे. ‘थॉमस रॉयटर्स एकॉन’च्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमधील भारताची एकूण एलपीजी आयात २.४ दशलक्ष टन होणार आहे. या तुलनेत चीनची आयात २.३ दशलक्ष टन आहे.
भारताची एलपीजी आयात प्रथमच चीनपेक्षा अधिक होत आहे. स्वयंपाकासाठी सरपण आणि गोवºया यांच्या जागी गॅसचा वापर वाढावा, याकरिता भारत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. त्यामुळे भारताची गॅस आयात वाढली आहे. २0१५च्या सुरुवातीला भारताची एलपीजी आयात प्रतिमाह अवघी १ दशलक्ष टन होती. त्यानंतर सरकारने गरिबांना मोफत गॅस देण्याची योजना आणली. ती कमालीची यशस्वी ठरली आहे.
डोरियन एलपीजीचे मुख्य वित्त अधिकारी टेड यंग यांनी सांगितले की, भारताची वृद्धी आश्चर्यकारक आहे. २0१५ मध्ये भारतात सबसिडीप्राप्त गॅस जोडण्या असलेल्या कुटुंबांची संख्या १४0 दशलक्ष होती. आता ती १८१ दशलक्ष झाली आहे.
२0१७ मध्ये भारताची मासिक एलपीजी आयात १.७ दशलक्ष टन होती. २.२ दशलक्ष टनांसह चीन भारताच्या खूपच पुढे होता. १ दशलक्ष टन आयातीसह जपान तिसºया स्थानी आहे. चीन, भारत आणि जपान या तिन्ही देशांत जगातील एकूण एलपीजीपैकी ४५ टक्के एलपीजी आयात होतो. भारतात एलपीजीची आयात वाढण्यास वाव आहे, असे डोरियन एलपीजीला वाटते. कंपनीने याच महिन्यात केलेल्या सादरीकरणानुसार, भारतात पेट्रोल-डिझेलवर प्रचंड प्रमाणात कर आहे. त्यामुळे एलपीजी वापरणे परवडणारे आहे. २२ टँकर्स असलेली अमेरिकास्थित डोरियन ही जगातील सर्वांत मोठी एलपीजी शिपिंग कंपनी आहे.
भारत बनणार सर्वांत मोठा एलपीजी आयातदार
सिंगापूर : चीनला मागे टाकून भारत द्रवरूप पेट्रोलियम गॅसचा (एलपीजी) सर्वांत मोठा आयातदार देश बनणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:46 AM2017-12-28T03:46:37+5:302017-12-28T03:46:44+5:30