Join us

2 लाखाचा शर्ट तर 5 लाखाचा लेहंगा; अंबानींच्या नवीन रॉयल मॉलमध्ये लक्झरी ब्रँड्सचा झगमगाट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 3:16 PM

India's Luxury Mall: अंबानी कुटुंबाने मुंबईत देशातील सर्वात महागडा ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ मॉल सुरू केला आहे.

India's Luxury Mall: मुंबईत भव्य कल्चरल सेंटरनंतर आता अंबानी कुटुंबाने देशातील सर्वात महागडा मॉल लॉन्च केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने मंगळवारी(31 ऑक्टोबर) ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ मॉलचे लॉन्चिंग केले. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सुरू झालेला हा मॉल आजपासून, म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’ हा देशातील पहिला सर्वात मोठा लक्झरी मॉल असल्याचे म्हटले जाते. मॉलच्या रेड कार्पेट इव्हेंटमध्ये बी टाऊनचे अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू झालेला हा मॉल 7500 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला आहे. देशातील हा पहिला मोठा आणि लक्झरी मॉल असल्याने अनेक महागड्या परदेशी लक्झरी ब्रँड्सना येथे जागा देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाच्या या मॉलमध्ये बॅलेन्सी, कार्टियर, लुई व्हिटॉन, व्हर्साचे, व्हॅलेंटिनो, मनीष मल्होत्रा, अबू जानी-संदीप खोसला, पॉटरी बार्न आणि गुच्ची यासह जगभरातील महागड्या ब्रँड्सचा समावेश आहे.

लक्झरी ब्रँडच्या महागड्या वस्तूफ्रेंच कंपनी लुई व्हिटॉनचे नाव जगातील सर्वात महागड्या ब्रँडमध्ये घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुई व्हिटॉन अंबानींच्या मेगा मॉलमध्ये आपले स्टोअर उघडण्यासाठी दरमहा 40 लाख रुपये भाडे देणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, लुई व्हिटॉनच्या एका स्वेटशर्टची किंमत 1.80 लाख रुपये आहे. यावरुनच तुम्ही या मॉलमधील वस्तुंच्या किमतीचा अंदाजा लावू शकता.

किंमत ऐकून चकीत व्हालज्वेलरी आणि घड्याळ कंपनी कार्टरनेही या मॉलमध्ये शॉप घेतले आहे. या फ्रेंच कंपनीच्या घड्याळांची किंमत 3 हजार डॉलर्सपासून ते 30 हजार डॉलर्सपर्यंत आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार, घडाळाची किंमत 2.5 लाख रुपयांपासून सुरू होते. याशिवाय प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या आऊटलेट्समध्ये लेहेंग्याच्या किमती 4 ते 5 लाख रुपयांपासून सुरू होतात.  

टॅग्स :मुकेश अंबानीनीता अंबानीजिओरिलायन्समुंबई