Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वस्त कर्जाच्या दिशेने भारताची वाटचाल

स्वस्त कर्जाच्या दिशेने भारताची वाटचाल

चलनवाढ नियंत्रणात आल्यामुळे व्याजदरही हळूहळू कमी होतील, कारण भारत आता स्वस्तातील कर्जाच्या दिशेने सरकत आहे, असे देशातील खासगी क्षेत्रातील

By admin | Published: August 18, 2015 10:06 PM2015-08-18T22:06:54+5:302015-08-18T22:06:54+5:30

चलनवाढ नियंत्रणात आल्यामुळे व्याजदरही हळूहळू कमी होतील, कारण भारत आता स्वस्तातील कर्जाच्या दिशेने सरकत आहे, असे देशातील खासगी क्षेत्रातील

India's move towards cheap credit | स्वस्त कर्जाच्या दिशेने भारताची वाटचाल

स्वस्त कर्जाच्या दिशेने भारताची वाटचाल

नवी दिल्ली : चलनवाढ नियंत्रणात आल्यामुळे व्याजदरही हळूहळू कमी होतील, कारण भारत आता स्वस्तातील कर्जाच्या दिशेने सरकत आहे, असे देशातील खासगी क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक आयसीआयसीआयने म्हटले.
या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर म्हणाल्या,‘‘ व्याजदरात कपात करायला सुरुवात करणारी आयसीआयसीआय ही पहिली बँक होती. मौद्रिक धोरणातील नरमाईचा बराच काही लाभ ग्राहकांना देण्यात आला आहे.’’
चालू खात्यावरील तोटा असो किंवा राजकोषीय तूट किंवा चलनवाढ, नियंत्रणात येत आहे. त्यामुळे स्वस्त व्याजदराच्या दिशेने प्रवास सुरू आहे, असे कोचर म्हणाल्या. ०.३० टक्के कपात आधीच झाली आहे. अशी कपात ही गुंतवणुकीतील तूटच आहे. मौद्रिक दरात कपात झाली की ठेवी कमी होतात. बँकांसाठी ठेवी म्हणजे गुंतवणूकच असते. भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर्षी आतापर्यंत तीनवेळा मिळून ०.७५ टक्के व्याजदरात कपात केली आहे. या कपातीनंतरचा व्याजदर ७.५ टक्के आहे. या महिन्यात ४ तारखेला जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक मौद्रिक धोरणात बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले होते की, मुख्य व्याजदरात कपात करण्याच्या आधी बँकांनी व्याज दर घटविले पाहिजेत.
कोचर म्हणाल्या, ‘‘व्याजदर कमी करण्यातच केवळ आम्ही पुढे नव्हतो तर इतर बँकांच्या तुलनेतही आम्ही जास्त व्याजदर घटवला.’’ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: India's move towards cheap credit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.